अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बारामती तालुका मेळावा संपन्न..
बारामती;-अंगणवाडी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र)पुणे जिल्हा कमिटी च्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बारामती तालुका मेळावा संपन्न होत असून दि.शनिवार, ३१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता बारामती शहरातील बारामती दुध संघ सभागृह, कसबा, बारामती याठिकाणी आयोजित केलेल्या मेळाव्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शन, मिनी अंगणवाडीचे श्रेणीवर्धन, मदतनीस व सेविकांचे प्रमोशन या मागण्यांसाठीचा गेले तीन वर्षे चाललेला लढा व यश या विषयावर राज्य अध्यक्षा शुभा शमीम मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले,या दोन्ही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.असे आशाबी शेख- जिल्हा अध्यक्षा, रजनी पिसाळ- जिल्हा सचिव यांनी कळविले.
No comments:
Post a Comment