तांदूळवाडी रस्त्यावर पथदिवे बसविण्याच्या मागणीला अखेर यश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 15, 2024

तांदूळवाडी रस्त्यावर पथदिवे बसविण्याच्या मागणीला अखेर यश..

तांदूळवाडी रस्त्यावर पथदिवे बसविण्याच्या मागणीला अखेर यश..
बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील बेलदार पाटील चौक ते तांदूळवाडी तलाठी कार्यालय या रस्त्यावरील पथदिवे बसविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली होती, यासंबंधी त्यावेळचे  भाजपच्या शहर महिला समन्वयक पिंकी
मोरे, सारिका लोंढे, सुनीता झेंडे, महेश नेटके, संतोष जाधव,चंद्रकांत केंगार, साक्षी काळे आदींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. चांगले रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे या भागात सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर मोठी रहदारी असते. महिला फिरण्यासाठी जात असताना चोरट्यांकडून त्यांचे दागिने हिसकाविले जात आहेत. पथदिवे
नसल्याने हे घडत असून, अंधाराचा फायदा घेत चोरटे काही क्षणातच पसार होत आहेत. पथदिवे नसल्याने छोटे-मोठे अपघात घडू लागले
आहेत. त्यामुळे तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी निवेदनात केली होती त्या निवेदनाची अखेर दखल घेत पथदिवे बसविण्यात आल्याने मुख्याधिकारी यांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment