पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या हिंदुस्थानच्या राष्ट्रमाताच- मा.सुनीलजी देवधर,राष्ट्रीय भाजपा नेते
बारामती:- बारामतीमध्ये सकल हिंदू समाज व मल्हार क्लबच्या माध्यमातून स्वतंत्र्याचा 77 वा दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृतिदिन व मल्हार क्लबचा 2 वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुनील देवधर यांनी अहिल्यादेवीचां संपूर्ण जीवनपट बारामतीकरांपुढे मांडून अहिल्यादेवीचे कार्य प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेऊन वंदन करावे एवढे मोठे होते.या हिंदुस्तानातच नव्हे तर अखंड विश्वामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या उंचीची महिला आपल्याला इतिहासामध्ये शोधून सापडत नाही.त्यांनी केलेले प्रत्येक कार्य हे देशाला एक दिशा देणारे आहे म्हणून अहिल्यादेवींचा विचार आणि त्यांची प्रत्येक कृतीचा अभ्यास आजचा पिढीने केला पाहिजे. प्रत्येक महिलेमध्ये जर अहिल्यादेवीचा विचार रुजला तर आपले राष्ट्र भक्कम दिशेने वाटचाल करेल. हा भारत हिंदूंचा देश राहिला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजा नंतर जर कोणी काम केलं असेल तर ते अहिल्यादेवीनी केला आहे.आपल्या देशाची स्थिती बांगलादेशसारखी होऊ नये म्हणून अहिल्यादेवींचा आदर्श आपण घेऊन तत्कालीन परिस्थितीमध्ये परकीय आक्रमण, मुस्लिम आक्रमणांना कसे उत्तर दिलं याचं मार्गदर्शन केले. या देशांमध्ये भारतमातेनंतर जर कोणाचे स्थान असेल तर अहिल्यामातेचे स्थान आहे म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीने अहिल्यादेवीचा आदर्श घेतला पाहिजे.आणि अहिल्यादेवी फक्त धनगर समाजाचे वैभव नसून अखंड राष्ट्राचे वैभव आहेत हे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेवनाना काळे होते. नवनिर्वाचित आमदार सत्कार मूर्ती मा.अमितजी गोरखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी अहिल्यादेवी यांच्या कार्याने मी प्रभावित झालो आहे असे नमूद केले. यावेळी सर्व समाजातील, सर्व पक्षातील पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाना पाटील देवकाते,ॲड.सुधीर पाटसकर,संदीप गुजर,दीपक पेशवे,पांडुरंग कचरे,अविनाश मोटे,अभिजित देवकाते, ॲड.राजेंद्र काळे,चंद्रकांत वाघमोडे,ॲड.जी बी.गावडे,ज्ञानेश्वरबापू कौले,अनिल लडकत,लक्ष्मण घोळवे,देवेंद्र बनकर,बापूराव सोलंनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बारामती परिसरातील व महाराष्ट्रातील काही महिलांचा अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये मंगलभाभी सराफ मा.नगराध्यक्ष,अंकिता पाटील युवा नेतृत्व,डॉ.भक्ती देवकाते तहसीलदार, मधुरा करंदीकर कौन्सलर,शुभांगी लोणकर वनाधिकारी, पियुषा पाटील रिलस्टार,आम्रपाली कोकरे लेखिका मल्हारयुग पुस्तक,मोनिका महानवर सभापती पनवेल महानगरपालिका,रेश्मा पुणेकर शिवछत्रपती पुरस्कार विजेती यांना प्रतिष्ठेचा अहिल्यारत्न पुरस्कार देण्यात आला.
उमेश रुपनवर यांना सह्याद्री करियर अकॅडमीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन मल्हाररत्न अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
यानंतर समाजरत्न पुरस्कार वासुदेवनाना काळे ,किरणदादा गुजर,संपततात्या देवकाते व डॉ. शशिकांत तरंगे देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्मयोगिनी पुरस्कार रेखा करंदीकर लेखिका 'धर्मशीला आहिल्या' यांना देण्यात आला. समाजगौरव पुरस्कार राजीव देशपांडे यांना देण्यात आला .
यावेळी कार्य गौरव पुरस्कार प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत असणार्या, सुंदर बारामती बनवणाऱ्या प्रत्येक विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांचा कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मा.सुनीलजी देवधर राष्ट्रीय नेते यांना राष्ट्रतेज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड.गोविंद देवकाते,ॲड.रमेश कोकरे,नवनाथ मलगुंडे,आकाश कांबळे,तेजस देवकाते,बापू लोखंडे,शेखर हुलगे,वैभव सोलंनकर, संतोष गालींदे,डॉ. अश्विनकुमार वाघमोडे,अर्चना जोशी,जगदीश कोळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
मल्हार क्लबचे अध्यक्ष अँड.गोविंद देवकाते यांनी बारामतीमध्ये भव्य दिव्य अहिल्यासृष्टी निर्माण व्हावी अशी मागणी केली,सूत्रसंचालन मेगा बडवेमॅडम यांनी केले
No comments:
Post a Comment