वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पंकजा मुंडे यांच्याकडूनही गौरवोदगार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 26, 2024

वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पंकजा मुंडे यांच्याकडूनही गौरवोदगार..

वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पंकजा मुंडे यांच्याकडूनही गौरवोदगार..
मुंबई (प्रतिनिधी):- दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेत दररोज काय मांडतायत यावर माझे लक्ष होते. रोज पाहत होतो त्यामुळे उत्सुकता होती. यापूर्वी अशा पध्दतीने पत्रकारांच्या प्रश्‍नांवर कोणी यात्रा केलेली नाही. माणूस प्रत्यक्ष बाहेर पडला की त्याला कोणतीही तयारी करून बोलावे लागत नाही. अनुभवाचा जिवंतपणा असतो आणि तो वसंत मुंडेंच्या बोलण्यामध्ये जाणवला. मुंडेंचे भाषण ऐकल्यानंतर त्यांना पत्रकार आणि नेता म्हणून भविष्य असल्याचे गौरवोदगार उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काढले. तर वसंत मुंडे लढावू, झुंजार अन कार्यक्षम असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी वसंत मुंडेंची पत्रकारांची संवाद यात्रा ही कल्पना खुप आवडली. यात्रा मुंडेंना चांगल्या जमतात असे सांगत पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी आता विधान परिषदेत मी आवाज उठवेल अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचा समारोप मुंबईत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. इतिहासातील पत्रकारांच्या प्रश्‍नांवरील पहिली यात्रा असल्याने सर्वांनीच या कल्पनेचे कौतुक केले. 27 जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दिडशेपेक्षा अधिक तालुक्यातून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या या यात्रेचे कौतुक करताना उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यापूर्वी अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी कोणी केला नाही. त्यामुळे यात्रा सुरू झाली तेव्हापासून ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी काय घडतंय, काय मांडतायत याकडे माझे लक्ष होते. पत्रकारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करत स्थानिक पातळीवर नेमकं काय चाललं आहे? याचा अंदाज या यात्रेच्या माध्यमातून घेतला गेला. त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. कारण मी मुळ कार्यशील कार्यकर्ता आहे. संघटनेसाठी तेरा वर्षे घर सोडून काम केले आहे. त्यानंतर अनेक पदांवर काम केले. त्यामुळे पत्रकार संवाद यात्रेत नेमकं काय चाललं आहे? याची उत्सुकता होती. वसंत मुंडेंच्या भाषणामध्ये तो जिवंतपणा जाणवला. माणूस बाहेर पडला की त्याला फारसी तयारी करून बोलावे लागत नाही. अनुभवातून नैसर्गिकपणे तो बोलतो, त्यात जिवंतपणा असतो ते जाणवले. वसंत मुंडेंचे भाषण ऐकल्यानंतर त्यांना पत्रकार आणि नेता म्हणून भविष्य आहे. असे गौरवोदगार त्यांनी काढले. तर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार संवाद यात्रेचे कौतुक करताना संघटनेचे प्रमुख वसंत मुंडे हे लढावू आणि कार्यक्षम अध्यक्ष असल्याने पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सरकार पुढाकार घेईल अशी ग्वाही दिली. माजीमंत्री आ.पंकजा मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मी ही पुन्हा संघर्षयात्रा यात्रा काढली आणि सरकार आले. आणि आता पत्रकारांच्या प्रश्‍नांवर वसंत मुंडे यांनी काढली. मुंडेंनाच यात्रा चांगल्या काढता येतात असे मिष्किलपणे सांगत संवाद यात्रेची कल्पना खुप आवडली. असे स्पष्ट केले. तर आता विधानपरिषद सभागृहात मी पुढच्या अधिवेशनात जाणार आहे. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवेल अशी ग्वाही दिली.

राज्यपाल नियुक्त सदस्य देण्याचे संकेत
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांबाबत विषय प्रलंबीत आहे. त्यात प्रामुख्याने कवी, पत्रकार, साहित्यीक, कला, क्रिडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संधी द्यावी असे आहे. पुर्वी काय झाले या खोलात जाण्यात अर्थ नाही, मात्र पत्रकारांचा प्रतिनिधी असावा अशी मागणी मिळत नाही तोपर्यंत लावून धरली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहेत की त्यांना विषय समजला (क्लिक) झाला की निर्णय घ्यायला आणि त्याची अमलबजावणी करायला वेळ लागत नाही. असे स्पष्टीकरण देत राज्यपाल नियुक्त कोठ्यातून पत्रकारांचा प्रतिनिधी सभागृहात जावू शकतो असे संकेत उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

No comments:

Post a Comment