पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 9, 2024

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन..

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन..
दिल्ली (प्रतिनिधी) :- पत्रकारांच्या विविध मागण्या सरकारला सांगण्यासाठी दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील असणार्‍या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संवाद यात्रेत मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत त्यासाठी आपणही प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्यावतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा सध्या सुरू आहे. दि.17 ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रा बारामती येथे पोहोचणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संवाद यात्रेला संबोधित करावे यासाठी शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील निवासस्थानी शरद पवार यांची पत्रकार संघाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नीलकंठ मोहिते, ग्रामीण सरचिटणीस सागर शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍यांना डिजिटल सह उत्पन्न करात पाच हजार रक्कमेची सूट द्यावी. असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातीवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा. राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी दहा हजार रकमेची तरतूद करावी. बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात. अधिस्वीकृती पत्रिका ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळावी. यासाठी प्रक्रिया सुलभ करावी यातील वेतन पावतीची अट रद्द करावी. यासह विविध 26 मागण्यांचे लेखी निवेदन शरद पवार यांना देण्यात आले. राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संवाद यात्रेची माहिती शरद पवार यांना जिल्हाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पवार यांनी पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.


No comments:

Post a Comment