बारामती नगर परिषदे समोर ज्येष्ठ महिलेचे उपोषण .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 22, 2024

बारामती नगर परिषदे समोर ज्येष्ठ महिलेचे उपोषण ..

बारामती नगर परिषदे समोर  ज्येष्ठ महिलेचे उपोषण ..
बारामती:- दिनांक: ९/८/२०२४ रोजी 
बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना लेखी निवेदन देण्यात आले,या निवेदनात बुरूड गल्ली वार्ड क्र. ६ मिळकत क्र.६१०००१४१/६१०००१३७ मिळकतीत राहत नसल्याने अतिशय गंभीर अवस्था व जिवीत हाणी घडून २१/१०/२०१९ दुरघटनेतील मुत्यु नंतर बा.न.प. कार्यालय सदर मिळकत उतरून घेत नाही या बाबत उपोषणाचा इशारा दिला होता,अर्जदार श्रीमती सुरेखा रामचंद्र साबळे
वय वृध्द (६६) जेष्ठ नागरीक रा. बुरूड गल्ली, बारामती.मी बुरूड गल्ली येथील कायमी रहीवासी असुन माझी घर मिळकत क्र. ६१०००१३५ ही यामध्ये राहत होती माझ्या तिन्ही
मुलींच्या लग्नानंतर माझे पती व मी या मिळकतीत राहात असल्याने तिची देखभाल चांगल्या स्थीतीत करून ठेवली होती परंतु
आमच्या बाजुस राहात नसलेली व देखभाल न झाल्याने मिळकत अतिशय धोकादायक झाली आहे. आणि या पासुन जिवास हाणी
निर्माण होईल यासाठी पतीने बा.न.प. कार्यालयाकडे २७/०९/२०१९ रोजी अर्जाद्वारे कळविले होते परंतु वरिष्ठ अधिकारी यांनी
याकडे दुर्लक्ष केली आणि वेळेत दखल व आदेश न झाल्याने माझ्या राहात्या घरावर भिंत कोसळुन माझे पती व घर दोनही गोष्टी संपुष्ठात आल्या.
विषयातील दोन्ही मिळकती माझ्या मिळकती समोर व वहीवाटा अडथळा निर्माण होऊन जिवीत हाणी घटना पुन्हा आमच्या बाबतीत घडु शकते याची माहिती मी बा.न.प. कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी , नगर रचना व मुख्याधिकारी
यांना वेळोवेळी लेखी अर्जाद्वारे व समक्ष भेटून पाठपुरवा करत असताना फक्त मिळकत दार यांना मागील सहा वर्षापासुन पावसाळ्यात नोटीस बजवत आहे आणी याकडे मिळकतदार दुर्लक्ष करत आहे असे असताना प्रशासान पुढील कार्यवही का करत नाही विचारणा केली परंतु टोलाटोलीचे उत्तर देत विषयाचे गांर्भीय लक्षात घेत नाही आणि आपली जबाबदारी तुन पळ काढत आहे.मला घरकुलचा लाभ दिला नसल्याने मागील सहा वर्षापासुन मी तिन्ही मुलीकडे राहत आहे माझ्या आजार पणामुळे मी हात उसणे पैसे गोळा करून कसे बसे माझे घर उभे केले आहे. परंतु अर्जातील नमुद असलेल्या मिळकती मुळे पुन्हा जिवीत हाणी सारखी घटना घडू नये हा धोका टाळता यावा यासाठी प्रशासनाची मदत मागत आहे की या मिळकती उतरून घेऊन जिवीत हाणी व धोका टाळा, परंतु मागील घटनेच्या परिस्थीतील माझ्या मानसिक व आर्थिक सर्व गोष्टी प्रशासन जबाबदार असताना आजही पुन्हा जिव जाण्याची वाट बघताय का? पुन्हा दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का? हा प्रश्न मी अधिकारी यांना वेळोवेळी करत आहे तरी माझ्या विनंती अर्जावर अक्षम्य दुर्लक्ष करून टोलवत आहे.मी अशा मानासिक त्रासाला कंटाळुन मला शुगर, बी.पी. व मनक्यात गॅप असताना देखील मी जिवाची कोणताही विचार
न करता बारामती नगर परिषद, भिगवण चौक येथे बुधवार दिनांक २१/०८/२०२४ रोजी सकाळी १० वा. अमरण उपोषणास बसत आहे या दरम्यान माझ्या प्रकृतीस काय झाले याला संपूर्ण जबाबदारी प्रशासनाकडे राहील यांची नोंद द्यावी.मी दिनांक २१/०८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते.त्या अनुषंगाने आज उपोषण करीत असल्याचे सांगितले,यावेळी अनेक महिलांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिबा दिला.

No comments:

Post a Comment