बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत हप्ता घेऊन चालू आहे अवैध दारू विक्री?कुणी केला आरोप.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 29, 2024

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत हप्ता घेऊन चालू आहे अवैध दारू विक्री?कुणी केला आरोप.!

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत हप्ता घेऊन चालू आहे अवैध दारू विक्री?कुणी केला आरोप.!
बारामती:-बारामती तालुक्यातील अवैध धंदे वाढत चालले असल्याचे अनेक बातम्या प्रसिद्ध होत असले तरी मात्र त्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे,काही महिण्यापूर्वी माळेगाव मध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी व दारू विक्रते यांच्यामध्ये झालेला वाद आजही लोक विसरले नाहीत,असे असताना देखील आज अवैध दारू राजरोसपणे विकली जात असल्याचा आरोप होतोय याबाबत काही निवेदन आली आहे, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचा तसेच पोलील भरमसाठ हप्ते घेऊन या अवैद्य दारू विक्री व्यवसाय चालवणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पणदरे ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे यांनी केला आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे आरोप
करतेवेळी म्हणाले की, माळेगाव पोलीस
ठाण्यातील  कर्मचारी हे भरमसाठ मोठ्या रकमेचा हप्ता एजंट मार्फत घेऊन अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांची पाठराखण करीत आहे. यामुळे युवा पिढी या व्यसनाला बळी पडून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत. यास सर्वस्वी जबाबदार माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आहेत.भविष्यामध्ये अशा व्यसनाना तरुण पिढी बळी पडू नये, म्हणून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या अवैद्य व्यवसायांवर कडक कारवाई करून अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना तडीपार करावे. तसेच हप्तेखोर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,अशी मागणी कोकरे यांनी यावेळी बोलताना केली असून लेखी निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment