बापरे..सहाय्यक पोलीस निरीक्षकावर थेट कोयत्याने हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 25, 2024

बापरे..सहाय्यक पोलीस निरीक्षकावर थेट कोयत्याने हल्ला..

बापरे..सहाय्यक पोलीस निरीक्षकावर थेट कोयत्याने हल्ला..
पुणे:-वाढती गुन्हेगारी ही घातक होत असल्याचे दिसत असताना चक्क  सहाय्यक पोलीस
निरीक्षकावरच थेट कोयता हल्ला
झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला झाला आहे  सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.भाडंण सोडविताना थेट पोलीस
अधिकाऱ्याच्या डोक्यात कोयता मारण्यात
आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलीस चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कार्यरत आहेत. दुपारच्या सुमारास
न्यू रॉयल ऑटो गॅरेज च्या समोर ससाणे
नगर रेल्वे गेटच्या जवळ एका  मोटरसायकल चालक व मागे बसलेले इसम यांची मोटरसायकल वरील इसम नामे निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये वाद चालू असल्याने व इग्नेटर वरील
निहालसिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील अनोळखी मुलगा हे होंडा एक्टिवा वरील इसमांना मारहाण करत असल्याने व त्यांच्याकडे कोयता
असल्याने तेथून जाणारे वानवडी पोलीस
स्टेशन कडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व नमूद इग्नेटर वरील इसमांकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांचे जवळ जात असताना इग्नेटर वरील इसम नामे निहालसिंग मन्नू सिंह टाक याने
त्याच्याकडील कोयता एपीआय रत्नदीप
गायकवाड यांना फेकून मारला.तो कोयता त्यांचे डोक्यात लागला असून, एपीआय रत्नदीप गायकवाड यांचे डोक्यात गंभीर जखमी झाली आहे. तसेच नमूद कोयता मारणारा इसमनामे निहाल सिंग मनसिंग टाक व त्याचे बरोबरील
अनोळखी साथीदार हे दोघेही तेथून सय्यद
नगर कडे पळून निघून गेले आहेत.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment