भारत बंदला समर्थन देण्यासाठी बुधवारी दि.२१ रोजी बारामती बंदचे आवाहन..
एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला
क्रिमीलेयर लावण्याचा व त्याचे वर्गीकरण
करण्याचा अधिकार केंद्र व राज्य
सरकारला देत असल्याचा निर्णय दिला
आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय
एससी एसटी समाजात फुट पडणारा व
त्यांची एकता तोडणारा असल्याचे सांगत
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णया
विरोधात बुधवारी (दि.२१) देशभरातील
एससी एसटी समाजाने भारत बंद ची
हाक दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील
एससी एसटी समाजाच्या वतीने या भारत
बंदला समर्थन देण्यासाठी बुधवारी बारामती बंदचे आवाहन करण्यात आले असून निषेध मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हा निषेध मोर्चा सकाळी १० वाजता आमराईतील सिद्धार्थ नगर येथून सुरु होणार असून
मुख्य बाजारपेठेतून पुढे जात तीनहत्ती
चौक या ठिकाणी निषेध सभेने या मोर्चाची
सांगता होणार आहे.या निषेध सभेत अनेक समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment