विकसित बारामतीत तीन हत्ती चौक की 'भुलभुलैया चौक' अपघाताचे सत्र चालूच..
बारामती:-बारामतीचा विकास होत असताना मात्र रस्ते अरुंद होत गेलेत तर वाहनांची गर्दी वाढत चालली आहे, यामुळे अपघातात वाढ होत असून अनेक अपघात झाल्याचे दिसत असून अनेकजण जखमी झालेत, नुकताच बारामती शहरातील महत्त्वाचे भाग असणारा भिगवण चौक नजीक तीन हत्ती चौक असून या चौकात रस्त्याच्या कामामुळे गेली अनेक महिने नागरिक त्रस्त झाले असून वारंवार होत असलेली तोडफोड व रस्त्याची कामे यामुळे नक्की काय चाललंय हे समजण्या पलीकडे गेले आहे,या चौकाची अशी दशा झालीय की तो तीन हत्ती चौक नसून 'भुलभुलैया चौक' म्हणण्याची वेळ आली असल्याचे अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. विकास होत असताना तो इतका होतोय की त्या कामामुळे अपघात होत आहे की एखाद्याचं जीव जाईल कारण याच रस्त्यावर उंच ड्रेनेज च्या झाकणाला धडकुन एका गरीब वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला अजूनही त्याच्या कुटुंबाला भरपाई मिळू शकली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल तर नुकताच रात्री दोन वाहने धडकल्याने मोठा अपघात झाला असल्याचे कळतंय त्यामुळे आत्ता तरी या चौकाचे काम लवकर पूर्ण होईल की पुन्हा पुन्हा तोडफोड करून जनतेचं पैसा वाया जाणार अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
No comments:
Post a Comment