उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र शासन लागू करणार नाही असा शब्द दिला शिष्टमंडळाला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 23, 2024

उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र शासन लागू करणार नाही असा शब्द दिला शिष्टमंडळाला..

उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र शासन लागू करणार नाही असा शब्द दिला शिष्टमंडळाला..
बारामती:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार यांची १ ऑगस्ट रोजी मा. सुप्रीम कोर्टाने क्रिमिलियर लावणे संदर्भात असंविधानिक घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली  दादांनी सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र शासन लागू करणार नाही असा शब्द शिष्टमंडळाला दिला त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सबंध महाराष्ट्रातील एससी/ एसटी समाज बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले, एस टी - एस सी शिष्टमंडळामध्ये नवनाथ बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष, गणेश सोनवणे नगरसेवक, अजित कांबळे,गजानन गायकवाड, मंगलदास निकाळजे, गौतम शिंदे, निलेश मोरे, सुरज  देवकाते, शुभम अहिवळे,पार्थ गालींदे, सतीश खुडे,सिताराम कांबळे , अँड अक्षय गायकवाड, विनय दामोदर, सिताराम कांबळे, किशोर मोरे, रोहित शिंदे, युवराज खिराडे व  एससी एसटी समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
   राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी माहिती दिली की आंबेडकर चळवळीतील व दलित समाजातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे सुप्रीम कोर्टाच्या क्रिमिलियर व वर्गीकरण संदर्भात लवकरच बैठक घेणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांनी शिष्टमंडळाला दिली,अशी माहिती नवनाथ बल्लाळ मा उपनगराध्यक्ष बा न प यांनी दिली.

No comments:

Post a Comment