उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार सवांद यात्रेस शुभेच्छा व पाठिंबा दिला.
पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुणे येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आले असता व्यासपीठावर जाऊन दादा सोबत चर्चा करून पत्रकार संवाद यात्रे संदर्भात माहिती दिली. पत्रकारांच्या मागण्या आपण मान्य कराव्यात व कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे यासाठी आपल्या राष्ट्रवादी पक्षातमार्फत न्याय देण्याची भूमिका मांडावी असे स्पष्ट सांगितले.उप मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत जी मुंडे संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वास जी आरोटे व संघटनेचे प्रेरणास्थान संघटक सन्माननीय संजयजी भोकरे यांनी हा पत्रकार संघटनेचा वटवृक्ष निर्माण केल्याचेही सांगितले त्यावेळी दादांनी मुंडेजी व भोकरेजी यांच्या कामाचा परिचय असल्याचे स्पष्ट केले व यात्रेस शुभेच्छा व पाठिंबा दिला. यावेळी माझ्यासोबत पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश जी वाघमारे व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment