बारामतीत श्वास मोकळा झाला पण,नरडं मात्र आवळले?'भुलभुलैया(तीन हत्ती) चौकाची' गाथा..
बारामती:-विकसित बारामतीचा कायापालट होत असताना करोडो रुपये खर्च होत आहेत नक्की उद्याची बारामती स्मार्ट सिटी असेल आणि ती असायलाच पाहिजे .मात्र विकास होत असताना त्याचा त्रास जनतेला होणार असेल तर त्याचा काय उपयोग विनाकारण तोडफोडीच्या नावाखाली लाखो रुपयेचे नुकसान होत असल्याचे दिसत असले तरी 'तेरी चूप और मेरी भी चूप' अशी अवस्था सर्वसामान्य जनतेची झालीय असो, नुकताच बारामती शहरातील मध्यवर्ती असणारा 'तीन हत्ती चौक' चांगलाच चर्चेत आलाय अनेक राजकिय पक्षानी याबाबत आवाज उठवला अक्षरशः त्या चौकाला'भुलभुलैया चौक' असा उपरोधिक नाव सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला,आज प्रत्येकजण याच नावाने उल्लेख करीत असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर झालेला डिझाइन व त्यातून कसरत करीत चालू असणारी वाहने पाहले असते तर नक्कीच तुम्ही काहीतरी बोलल्याशिवाय राहिला नसता कारण याठिकाणी अनेक अपघात झालेत पण काही बातम्या प्रसिद्ध व आंदोलने झाल्यानंतर याच चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहे तर वसंतनगर टी सी कॉलेज मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पुनावाला बागेसमोर गर्दी कमी करून दोरी लावली असून ट्रपिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.त्यामुळे काही अंशी श्वास मोकळा झाला असला तरी मात्र वसंतनगर कडून येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, नागरिकांना, पालकांना मोठा राउंड मारून भिगवण चौकाकडे यावे लागते पण हे करीत असताना रेल्वे गेट ते म ए सो हायस्कूल गेट आणि एम आय डी सी कडून येणारे व तीनहत्ती चौकाकडून एम आय डी सी कडे जाणाऱ्या वाहनांमुळे वसंतनगर कडून येणाऱ्या वाहनांना जीव मुठीत धरून रस्ता पास करून ऊ टन घ्यावा लागत आहे कारण समोरून भरधाव येणारे वाहन व या ठिकाणी असणारी गर्दी व तिथे ट्रपिक पोलीस नसल्याने जीव मुठीत घेऊन वाहन चालविणे किती जिकरीचे झालेय हे त्याठिकाणी जाऊन आलेल्या प्रवास्याला विचारा तो सांगेल, शाळा सुटताना व भरताना होत असलेली गर्दी, रेल्वे आल्यानंतर प्रवासी बाहेर येतानाची गर्दी नक्कीच श्वास मोकळा झाला पण,नरडं मात्र आवळले?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment