बारामती शहर व परिसरातील दहिहंडी उत्सव मंडळांना आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 25, 2024

बारामती शहर व परिसरातील दहिहंडी उत्सव मंडळांना आवाहन..

बारामती शहर व परिसरातील दहिहंडी उत्सव मंडळांना आवाहन..
बारामती:- दिनांक २८/८/२०२४ रोजी बारामती शहर व परिसरात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे.त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. सुदर्शन राठोड यांनी दहीहंडी उत्सव आयोजकांना आवाहन केले आहे की, डी.जे. / डॉल्बी सिस्टीम या संयंत्रांचा वापर टाळावा. साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादीत ठेवावा.त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी बाहेरून नृत्य करणाऱ्या स्त्रीयांना निमंत्रित करू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दहीहंडी मंडळानी प्रशासनास सहकार्य करावे. व दहीहंडी उत्सव शांततेत तसेच सौहार्दाचे वातावरणात पार पाडावा,असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment