भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची rpi ची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 2, 2024

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची rpi ची मागणी..

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची rpi ची मागणी..
बारामती:- बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमधील संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच सदर ठिकाणी 24 तास सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत यासोबतच RPI(आठवले)पक्षाच्या आंदोलनाची दखल घेऊन ज्या प्रकारचे विद्युत पोल काही ठिकाणी बसवण्यात आलेत तशाच प्रकारचे विद्युत पोल शहरातील उर्वरित झोपडपट्टी परिसरात देखील बसवण्यात यावेत असे लेखी निवेदन दि.31/7/2024 रोजी मा.महेश रोकडे (मुख्याधिकारी बा न प) यांना देण्यात आले.यावेळी मा.रत्नप्रभा ताई साबळे (महिला उपाध्यक्षा प महारष्ट्र ) मा.रजनी ताई साळवे (महिला सरचिटणीस पुणे जिल्हा)तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.शुभम चव्हाण आणि आश्विन धेंडे देखील उपस्थित होते.अशी माहिती रविंद्र(पप्पू)सोनवणे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI (आठवले)यांनी दिली.

No comments:

Post a Comment