संतापजनक..चक्क 75 वर्षीय वृद्धेवर युवकाचा बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 1, 2024

संतापजनक..चक्क 75 वर्षीय वृद्धेवर युवकाचा बलात्कार..

संतापजनक..चक्क 75 वर्षीय वृद्धेवर युवकाचा
बलात्कार..
सांगली :-नुकताच एक संतापजनक घटना समोर आली,वाळवा तालुक्यातील एका गावात 75 वर्षाच्या वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला. संतप्त नागरिकांनी युवकाला पकडून बेदम चोप दिला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय 28 ) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पिडीत वृद्धेवर सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, वृध्दा ही पुतण्याच्या कुटुंबाबरोबर राहत होती. सोमनाथ याचे
वृद्धेच्या घरात येणे-जाणे होते. शनिवारी तिच्या घरातील इतर लोक बाहेर गेले होते. वृध्दा घरात एकटीच होती.सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संशयित सोमनाथ हा घरात वृद्धेच्या घरात शिरला. त्याने वृद्धेवर बलात्कार केला.
तिने ओरडा-ओरडा केल्याने शेजारील महिलानी वृद्धेच्या घराकडे धाव घेतली. महिलांनी संशयित सोमनाथ याला पकडून चोप दिला. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सोमनाथ याला त्यांनी बेदम मारहाण केली लोकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.सहायक पोलिस निरीक्षक राहूल घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ याला ताब्यात घेतले. वृद्धेला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयातच वृद्धेचे जबाब घेतले.तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment