धक्कादायक..दोन लाख परत मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करेन या धमकीला घाबरून एकाची आत्महत्या..मरणापूर्वी लिहिली चिट्टी.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 12, 2024

धक्कादायक..दोन लाख परत मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करेन या धमकीला घाबरून एकाची आत्महत्या..मरणापूर्वी लिहिली चिट्टी.!

धक्कादायक..दोन लाख परत मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करेन या धमकीला घाबरून एकाची आत्महत्या..मरणापूर्वी लिहिली चिट्टी.!
बारामती:-दि. 11/09/2024 रोजी रात्री 10/30 वाजता आज दिनांक 12/09/2024 रोजी पहाटे 5/10 वाचे दरम्यान जुना मोरगाव रोड लेंडीपट्टी ता. बारामती जि.पुणे गु. दा. ता. वेळ 12/09/2024 रोजी 16/29 वा इंन्ट्री नं 27/2024  नुसार बारामती शहर पो.स्टे.गु. रजि नं. 687/2024 BNS 108,351(2), (3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत फिर्यादी पल्लवी ज्ञानेश्वर देवरात वय 32 वर्षे व्यवसाय गृहीणी रा. गुणवडी ता. बारामती जि.पुणे यांनी फिर्याद दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11/09/2024 रोजी रात्री 10/30 वा ते आज दिनाक 12/09/2024 रोजी पहाटे 5/10 वाचे दरम्यान माझे पती ज्ञानेश्वर गोपाळराव देवरात वय 36 वर्षे रा. गुणवडी ता. बारामती जि. पुणे यांनी ज्योती आगवणे यांना दिलेले 2 लाख रूपये परत मागीतले वरून व ते पुन्हा न मागावे या उद्देशाने 1) ज्योती महादेव आगवणे रा. एकतानगर एमआयडीसी बारामती ता. बारामती जि. पुणे (2) बाळु केशव कोळेकर 3) नाजनीन राजु शेख दोघे रा. कुंभारकर वस्ती डायनामिक्स कंपनीच्या मागे बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी माझे पती यांचेवर बलात्काराची केस करण्याची धमकी देवुन वारंवार त्रास देवुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून व तशा मजकुराची चिट्टी मरणा पुर्वी माझे पती यांनी लिहून ठेवली असल्याने माझी 1) ज्योती महादेव आगवणे रा. एकतानगर एमआयडीसी बारामती ता. बारामती जि.पुणे 2) बाळु केशव कोळेकर 3) नाजनीन राजु शेख दोघे रा. कुंभारकर वस्ती डायनामिक्स कंपनीच्या मागे बारामती ता. बारामती जि. पुणे याचे विरोधात तक्रार असून अंमलदार-पो. हवा.शेख यांनी दाखल करून घेतली असून तपास सपोनि भिताडे करीत आहे.

No comments:

Post a Comment