बारामतीत ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीमध्ये लावलेल्या डिजेवर पोलिसांनी केली कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 26, 2024

बारामतीत ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीमध्ये लावलेल्या डिजेवर पोलिसांनी केली कारवाई..

बारामतीत ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीमध्ये लावलेल्या डिजेवर पोलिसांनी केली कारवाई..
बारामती:-बारामतीत डिजेवर कारवाई चा धडाका चालू असून दहीहंडीच्या दिवशी बारामतीत डिजे चालकांवर कारवाई करण्यात आली त्यानंतर गणेश विसर्जनच्या वेळी देखील डिजेवर कारवाई करण्यात आली आत्ता नुकताच बारामती शहर येथे ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीमध्ये डिजे वाजविण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी राहुल कल्याण वाघ पोलीस शिपाई ब.नं. 2909 नेमणुक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनेकांवर कारवाई करण्यात आली त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) एकता बॉईज फलटण रोड यांनी अमित उत्तम दुरुगुडे रा. शिरष्णे ता बारामती जि पुणे,(2) गरीब नवाज फ्रेंड सर्कल, कसबा चौक, बारामती यांनी करण बाळ भिराडे रा. मंगळवार पेठ फलटण ता फलटण जि सातारा, (3) शेर-ए-म्हैसुर यंग सर्कल यांनी विनायक चंद्रकांत शिरसाठ रा. कारभारी नगर जामदास्रोड बारामती जि पुणे , (4) मुजावरवाडा यंग सर्कल, चैत्राली हॉटेल समोर बारामती यांनी विकास सोपान सोनवणे रा. कसबा बारामती ता.बारामती जि पुणे,(5) हंटर बॉईज, भिगवण चौक बारामती यांनी प्रशांत विलास यादव रा. छत्रपती संभाजी नगर,भिगवण रोड बारामती,(6) फूल अॅन्ड फाईनल ग्रुप गुणवडी चौक बारामती यांनी सचिन संपत हिवरकर रा. शिर्सुफळ ता बारामती जि पुणे,(7) सुलतान ग्रुप गुणवडी चौक बारामती यांनी अजय आनंदा जाधव रा. नरसिंहवाडी ता तासगाव जि सांगली,(8) शेर-ए- सल्तनत गुणवडी चौक बारामती यांनी संदिप विठ्ठल कदम रा. जळगाव कप ता. बारामती जि पुणे,(9) सोहेल अयाज शिकीलकर मुजावरवाडा यांनी समिर अशोक बनसोडे रा. पत्रा तालिम ता. तुळजापुर जि उस्मानाबाद, (10) मल्लक फ्रेड सर्कल कसबा चौक बारामती यांनी अनिकेत भारत सोनवणे रा. पंचशिलनगर ता बारामती जि पुणे,(11) रियासत ए सुलतान ग्रुप कसबा चौक बारामती यांनी शेहजान मोहम्मद मुलाणी रा. वेळापुर ता माळशिरस जि सोलापुर,(12) सलाक उस्मानिया कसबा चौक बारामती यांनी दत्तात्रय हनुमंत लावंड रा. थेउर ता हवेली जि पुणे , (13) कसबा मुस्लीम यंग ग्रुप यांनी वाजीद इशाद झारे रा. कसबा चौक बारामती जि पुणे,(14) अब्बास अली सामाजिक प्रतिष्ठान पतंगशहानगर बारामती जि पुणे यांनी शुभन रमेश अवताडे रा. रुई बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करून या कलमानुसार बारामती शहर पो.स्टे. गु .रजि. नं. 712/2024 भारतीय न्याय संहिता कलम 292,293,223 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे,दिनांक 22/09/2024 रोजी सायंकाळी 17/00 वा ते 22/00 वाचे दरम्यान मौजे बारामती शहर येथे
 ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीमध्ये  ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीचे समोर बंदोबस्त यादी प्रमाणे सर्व पोलीस स्टाप बंदोबस्त करित असताना वर नमुद आरोपी क्रमांक. 01 ते 14 यांनी त्यांच्या कडील टेम्पो मधील धोकादायक रित्या साऊंड लावुन बारामती परीसरात असलेले हॉस्पीटल यांचेकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना त्यांना तोंडी समज देवुनही त्यांनी लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान्यता केली आहे. वेळोवेळी त्यांना डी जे साऊंड सिस्टम थांबण्याच्या सुचना देवुनही ते न थांबता त्यांनी डीजे साऊंड तसेच चालु ठेवुन मा. जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेशा नुसार क्र.प.ग.क/कावि/4041/2024/दि 20/09/2024 अन्वये मु.पो.अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चा अंमल पुणे ग्रामीण दिनांक 22/09/2024 रोजी 00/05 वा पासुन ते दिनांक 05/10/2024 रोजी 24/00 वा पर्यन्त जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणुन वरील नमुद डी जे चालक/मालक व वाहनांचे मालक यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 292,293,223 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आली असून पो. हवा. वीर यांनी दाखल करून तपास पो. हवा. टापरे करीत आहे अशी माहिती प्रभारी अधिकारी - पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment