सुपा पोलीस स्टेशनची पुन्हा एक दमदार कामगिरी दिवसा घरफोडी चोरी करणारासराईत गुन्हेगारास शिताफीने अटक करुन त्याचे कडून लाखो रुपयाचे गुन्हयात चोरलेले सोन्या, चांदीचे दागीने हस्तगत. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 27, 2024

सुपा पोलीस स्टेशनची पुन्हा एक दमदार कामगिरी दिवसा घरफोडी चोरी करणारासराईत गुन्हेगारास शिताफीने अटक करुन त्याचे कडून लाखो रुपयाचे गुन्हयात चोरलेले सोन्या, चांदीचे दागीने हस्तगत.

सुपा पोलीस स्टेशनची पुन्हा एक दमदार कामगिरी दिवसा घरफोडी चोरी करणारा
सराईत गुन्हेगारास शिताफीने अटक करुन त्याचे कडून लाखो रुपयाचे गुन्हयात चोरलेले सोन्या, चांदीचे दागीने हस्तगत.
सुपा:- पुणे ग्रामीण जिल्हात दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने सदरचे आरोपी अटक करणे हे पोलीसा समोर एक मोठे आव्हान झाले होते. सदरच्या घडणा-या गुन्हया बाबत मा.पोलीस अधिक्षक  श्री.पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार, मा.उप.विभागिय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन राठोड यांनी दिवसा व रात्री घरफोडी करणारे आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक २५/०९/२०२४ रोजी गुप्त बातमी दारामार्फत मिळालेली माहिती व तांत्रीक तपासा वरुन संशईत आरोपी नामे पांडुरंग भाऊसो कुदळे वय ४० वर्षे रा.गिरीराज नगर पिंपळी बारामती ता. बारामती जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस चौकशी करता त्याने सुपा पोलीस स्टेशनचे हात सुपाता. बारामती जि. पुणे व देऊळगाव रसाळ
ता.बारामती जि.पुणे येथे दिवसा घरफोडी केली असल्याची कबुली दिली असुन त्याचे कडुन सुपा
पोलीस स्टेशन गु.र.नं. २४९/२०२४ बी.एन.एस.३३१(३),३०५(ए) मधिल चोरलेला एकुन ४०,००० रुपये किंचा मुद्देमाल व सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. २५० / २०२४ बी.एन.एस.३३१(३),३०५(ए) मधिल चोरलेला एकुन ४९, ५०० रुपये किंचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व गुन्हा करतेवेळी वारलेल्या इतर वस्तु असा एकुन १,३९,६५० रुपये किंचा मुद्देमाल जप्त करुन २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक साो श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.गणेश बिरादार, मा.उप.विभागिय पोलीस अधिकारी श्री.सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो. नि.मनोजकुमार नवसरे,पो.स. ई. जिनेशकोळी,
पो.हवा.रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे,पो.कॉ.सचिन दरेकर,सागर वाघमोडे, संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment