धक्कादायक..कोचिंग क्लासेस मध्ये चाललंय काय,क्लासेस चालकासह तीन भावांचा विद्यार्थीमुलीवर अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 29, 2024

धक्कादायक..कोचिंग क्लासेस मध्ये चाललंय काय,क्लासेस चालकासह तीन भावांचा विद्यार्थीमुलीवर अत्याचार..

धक्कादायक..कोचिंग क्लासेस मध्ये चाललंय काय,क्लासेस चालकासह तीन भावांचा विद्यार्थी मुलीवर अत्याचार..
मुंबई :-सद्या खाजगी कोचिंग क्लासेस, अकॅडमी, शिकवणी असे अनेक संस्था निर्माण होऊ लागल्या आहेत, शाळा, हायस्कूल, कॉलेज ला विद्यार्थी कमी असतील एवढे विद्यार्थी आत्ता खाजगी क्लासेसच्या वर्गात पहावयास मिळत आहे लाखो रुपये फी आकारणी करून हमखास पास करण्याची भुरळ घालून ऐन परीक्षेच्या वेळी आपल्या संपर्कात असणाऱ्या शाळेत पेपर देऊन(अर्थात कॉफी पुरवून )पास करण्याची यांची हमखास हमी देणाऱ्या अनेक क्लासेस,अकॅडमी पाहिल्या असतील अश्या या भूलथापांना बळी पडून अनेक विद्यार्थीनीना वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे गेल्याचे उदाहरणे आहेत नुकताच दक्षिण मुंबईत खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या तीन भावांनीच १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या
घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन
भावांबरोबरच शिक्षकाला रविवारी मुंबई विमानतळाजवळून अटक करण्यात आली. आरोपी दक्षिण मुंबईत आठवी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस चालवितात. तीनही भावांविरोधात पीडित मुलीचा विनयभंग, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. शनिवारी दोघांना अटक केली. या प्रकरणातील
आरोपी मोठा भाऊ रविवारी आई-वडिलांसोबत कुलू मनालीहून परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळाजवळून अटक केली. हा
गुन्हा मध्य मुंबईतील एका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आणि नंतर कोचिंग क्लासेस असलेल्या दक्षिण मुंबईतील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.अशी फुटली गुन्ह्याला वाचा
ही मुलगी २०२२ मध्ये शिकवणीला जात होती. त्यावेळी तिच्यासोबत ३५ ते ४० मुले होती. तिच्या वागण्यातील बदलतिच्या आईला जाणवला. तिने मुलीचे समुपदेशन केले असता, तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यातून तिघा भावांच्या गुन्हेगारी कृत्याला वाचा फुटली.अश्या कितीतरी मुली आजही बळी पडत आहेत.

No comments:

Post a Comment