बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन २०२३-२०२४ ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 30, 2024

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन २०२३-२०२४ ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन २०२३-२०२४ ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
बारामती:-बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन २०२३-२०२४ ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २८ सप्टेबर रोजी २०२४ मुख्य आवार येथे माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे यांचे  प्रमुख्य उपस्थिती व बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन २००४ पासुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बाबत शासना कडुन निर्देश आले त्या पासुन आजची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. 
 बारामती बाजार समितीचे विकास व विस्तारामध्ये तालुक्याचे आमदार म्हणुन अजितदादांचे खुप मोठे योगदान आहे असे मत बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले. तसेच बारामती बाजार समितीमध्ये राबविलेले विविध उपक्रम व शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेसाठी आवारात असलेल्या सोई-सुविधा यामुळे राज्यातील ३०६ बाजार समित्यामध्ये बारामती बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला यांचे सर्व श्रेय समितीचे सभापती व संचालक मंडळ, सचिव व माजी संचालक मंडळ तसेच  सेवक यांना जात असल्याचे मदननाना देवकाते यांनी सांगितले. यावेळी सभापती सुनिल पवार यांनी बारामती बाजार समितीने सन १९३५ चे स्थापनेपासुन समितीची वाटचाल व विकास आणि पुरविलेल्या सोई-सुविधा तसेच उपक्रम आणि समितीची झालेली उलाढाल व उत्पानात झालेली वाढ याचा संपुर्ण कामाजाचा आढावा प्रास्तविकात मांडला. तसेच समितीने सुपे येथे शासकीय ७ हे. ०३ क्षेत्र खरेदी केली आहे. त्याठिकाणी नवीन उपबाजार आवार विकसित करीत असुन तेथे व्यापारी गाळे, सेलहॉल, कर्मशिअल गाळे, दोन टॉयलेट ब्लॉक या  कामांची सुरूवात लवकर करीत आहोत. तसेच झारगडवाडी येथील शासकीय गायरान २१ एकर क्षेत्र उपबाजार आवाराकरीता समितीस मा. अजितदादांचे मुळे विनामुल्य मिळाले असुन त्याठिकाणी ही समिती उपबाजार विकसित करणार आहे. त्यामुळे सभेत मा. अजितदादांचा अभिनंदनाचा ठराव संमत करणेत आला. मुख्य आवारात रेशीम कोष खरेदी विक्री प्रकल्प इमारती करिता शासनाकडुन रू. १७.५ कोटी मंजुर झाला असुन सदर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तसेच जळोची उपबाजार येथे ऑफीस इमारत व १६ गाळे आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचे बांधकाम पुर्ण झाले आहे. या सर्व सुविधेमुळे बारामती बाजार समितीचा नावलौकीक वाढत चालला आहे. भविष्यात ही आणखी उपक्रम राबविणेचा समितीचा मानस आहे.  
एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने समिती तर्फे उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या शेतकरी, आडतदार, खरेदीदार, हमाल, मापाडी आणि सेवक यांचा सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन सन्मान करणेत आला. यामध्ये मुख्य यार्ड मधील व्यापारी अरविंद वीर, अशोक भळगट,वैभव शिंदे, सिद्धार्थ गुगळे, निलेश भिंगे, आणि जळोची येथील फळे व भाजापाला आडतदार सुनिल होले, इम्रान बागवान, प्रशांत जंजिरे, संतोष बोद्रे , अक्षय चल्हाण व सुपे उपबाजार येथील आडदार व खरेदीदार पांडुरंग चांदगुडे, रमणलाल तेली यांनी  शेतमालाची खरेदी विक्री मध्ये उच्चतम काम केल्याने आणि भुसार, लिंबु, कांदा, फळे,  भाजीपाला उत्पादक शेतकरी माऊली भापकर, रमेश यादव, सत्येंद्रराजे निबंळाकर, गणेश ढवाण, भिमराव लोखंडे, फत्तेशिंग गोंडगे, रेशीम कोष शेतकरी कुंडलीक वाघमारे या शेतक-यांनी शेती मध्ये जादा उत्पादन व त्यांचे शेतमालास जादा दर मिळाला असल्याने  आणि समितीचे सेवक सुर्यकांत भगवान मोरे, निरीक्षक यांनी उत्कृष्ठ काम केल्याने तसेच हमाल बाळासो जाधव व मापाडी संभाजी शितोळे यांना उत्कृष्ठ कामगिरीमुळे बारामती समिती तर्फे सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन सत्कार करणेत आले. वार्षिक सभा खेळी मेळीत संपन्न् झाली.
एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले. यावेळी पोपटराव गावडे, सचिन सातव, राजेंद्र गावडे, धनवान वदक, अशोक नवले, अशोकराव जगताप, अशोकराव मुळीक, वसंतराव तावरे, नारायण कोळेकर, अनिल आटोळे, बाळासो परकाळे तसेच समितीचे सदस्य विनायक गावडे, बापुराव कोकरे, रामचंद्र खलाटे, दयाराम महाडीक, सतिश जगताप, सौ. प्रतिभा परकाळे, सौ. शोभा कदम, शुभम ठोंबरे, विश्वास आटोळे, अरूण सकट, युवराज देवकाते, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितिन सरक आणि समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी  आणि वि.का. संस्थेच प्रतिनिधी व ग्रामपंचातीचे प्रतिनिधी तसेच समितीचे सेवक उपस्थित होते. सभेचे आभार उपसभापती निलेश लडकत यांनी मानले.

No comments:

Post a Comment