पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करून एक चारचाकी कार व दोन गावठी पिस्टल असा एकूण २,५१,६००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 30, 2024

पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करून एक चारचाकी कार व दोन गावठी पिस्टल असा एकूण २,५१,६००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत..

पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करून एक चारचाकी कार व दोन गावठी पिस्टल असा एकूण २,५१,६००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत..
बारामती:- पोलीस असल्याची बतावणी करून भंगार व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करून एक चारचाकी कार व
दोन गावठी पिस्टल असा एकूण २,५१,६००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला याकामी स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पो स्टे
पुणे ग्रामीण ची कारवाई बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९९ / २०२४ भा. न्याय सं. २०२३ चे कलम २०४, ३०७ आर्म अॅक्ट ३,५,२५ प्रमाणे दि.२४/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे कुतुबुद्दीन सुभेदार शहा वय ४० वर्षे,
व्यवसाय भंगार खरेदी-विक्री, रा. स्प्रिंग व्हिलेज, तांदुळवाडी, बारामती ता. बारामती जि. पुणे याचे मौजे लोखंडे वस्ती,वंजारवाडी ता. बारामती येथे भंगार खरेदी-विक्रीचे दुकान असून दि. २३/०९/२०२४ रोजी फिर्यादी हे दुकानावर असताना चार अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पांढरे रंगाचे आय- २० कार मधून येवून भंगार व्यावसायिकास त्यांचेकडील कार विक्री
करावयाची आहे असे सांगितले, कारला कोणताही नंबर नसल्याने फिर्यादीने कार खरेदी करण्यास नकार दिले नंतर आरोपींनी
पोलीस असल्याची बतावणी करून त्यास आय- २० कारमध्ये बसवून घेतले त्याचेजवळील मोबाईल व आठ हजार रूपये रोख रक्कम काढून घेतली. तु चोरीचा माल खरेदी केला आहे, पंधरा लाख रूपये दे नाहीतर, तुला भिगवण पोलीस स्टेशनला घेवून जाऊ, असे आरोपींनी सांगितले नंतर फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा आरोपीपैकी एकाने त्याचेजवळील पिस्तुल काढून
पिस्तुलचा धाक दाखवून त्यास ओरडायचे नाही असे सांगितले, त्यानंतर त्यास दौंड-नगर हायवे रोडने घेवून जावून चिखली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले. वगेरे प्रकाराबाबत फिर्यादीने बारामती तालुका पो स्टे येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.गुन्हयाचा प्रकार हा गंभीर असून पोलीस बतावणी करून फिर्यादीस लुटण्यात आले होते. सदर गुन्हा उघडकीस
आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना करून रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करणेत आली. फिर्यादीकडून आरोपीचे, कारचे वर्णन प्राप्त करून घेतले. तसेच फिर्यादीस ज्या रोडने नेण्यात आले त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पांढरे रंगाची आय २० कार आढळून आली. दरम्यान पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरूवात केली असता, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हयात वापरलेली पांढरे रंगाची आय-२० कार ही संतोष लक्ष्मण भंडलकर रा. उमाजी नाईक चौक, एसटी स्टँड शेजारी, पणदरे ता. बारामती तालुका जि पुणे हा
वापरत असून त्याने त्याचे इतर साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. अशी बातमी मिळाली.संशयित आरोपी संतोष भंडलकर याचा शोध घेण्यास सुरूवात केली असता, संतोष भंडलकर हा त्याचेकडील आय- २० कारने त्याचे इतर साथीदारांसह सोलापूर बाजूकडे जात असल्याची बातमी मिळाली. तांत्रिक विश्लेषणा द्वारे तातडीने नियोजन करून सोलापूर हायवे लगत हिंगणगाव परिसरात सापळा रचून आरोपी नामे १) संतोष लक्ष्मण भंडलकर, वय ४२ वर्षे रा.
उमाजी नाईक चौक, एसटी स्टैंड शेजारी, पणदरे ता. बारामती तालुका जि पुणे २) सुरेश अशोक राखपसरे, वय ३३ वर्षे, रा.के. के. घुले विदयालय समोर, कुंजीर वस्ती, मांजरी ता. हवेली, पुणे असे त्यांचेकडील पांढरे रंगाची आय २० कार नं.
एम.एच. १२ जी.व्ही. ८३८३ या वाहनासह मिळून आले त्यांचेकडील चौकशीमध्ये त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदार नामे ३)शेखर सुभाष शिंदे, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे, ४) सुरज शंकर मदने, सध्या रा. माळेगाव ता. बारामती, जि पुणे मुळ रा.सगोबाची वाडी, पणदरे ता. बारामती जि.पुणे, ५) हरीभाऊ बबन खुडे, ६) अशोक गणपत बनसोडे, दोघे रा. के.के. घुले
विदयालय जवळ, कुंजीर वस्ती, मांजरी ता. हवेली, पुणे यांनी मिळून संगणमताने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी शेखर सुभाष शिंदे, वय ३२ वर्षे, हा सांगवी ता. बारामती जि. पुणे यास सांगवी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चारचाकी कार व गुन्हयात वापरलेली एकूण दोन गावठी पिस्टल व
आठ जिवंत काडतूस असा एकूण २,५१,६००/- र. किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
आरोपींना विश्वासात घेवून सोलापूर कडे जाणेबाबत चौकशी केली असता, सांगोला-जत मार्गावरील शेगाव गावातील सोनार व्यावसायिकास लुटणार असल्याची माहिती मिळाली असून यातील आरोपी सुरज मदने याने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा केलेला असल्याची माहिती मिळाली असून त्याचे राहते घरासमोर एक ट्रॅक्टर मिळून आला असून सदर ट्रॅक्टरचे मालकाचा शोध घेण्यात येत असून सदरचा ट्रॅक्टर कोठून चोरी झाला आहे याबाबत तपास चालू आहे.
आरोपी सुरज शंकर मदने हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सातारा जिल्हयातील लोणंद, वाठार, भुईंज, फलटण,सातारा शहर, तसेच पुणे ग्रामीण जिल्हयातील यवत, बारामती तालुका, बारामती शहर पोलीस स्टेशनला एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत ट्रॅक्टर चोर आहे. तसेच इतर आरोपींवर देखील प्रत्येकी दोन-तीन गुन्हे दाखल असून सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख,पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पो स्टे च्या पो नि वैशाली पाटील, स्था. गु.शाचे
सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजी मोहिते, सपोनि राहुल गावडे, अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे,
स्वप्निल अहीवळे, विनोद पवार, अजय घुले, राजु मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धिरज जाधव, तुषार भोईटे, सागर नामदास, बारामती तालुका पो स्टे चे पोउपनि युवराज पाटील, अंमलदार राम
कानगुडे यांनी केली असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.

No comments:

Post a Comment