बारामतीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीकायम राखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात:युगेंद्र पवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 1, 2024

बारामतीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीकायम राखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात:युगेंद्र पवार

बारामतीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीकायम राखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात:युगेंद्र पवार
बारामती:- उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग,यांना नुकताच निवेदन देण्यात आले यावेळी या निवेदनात
बारामती सारख्या शांतताप्रिय शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एका विद्यार्थ्याचा
निर्घृण खून करण्यात आला, तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील काही तरुणांना
सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शहरातील ही वाढती
गुन्हेगारी मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. गुन्हेगारांना सहजरित्या हत्यारे मिळतात आणि ते
समाजामध्ये दहशत माजवित सुटतात असा हा एकंदर प्रकार आहे.शहरातील आणि तालुक्यातील गुन्हेगारांना कसलाही धरबंद राहिलेला नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील दहशतीच्या छायेखाली वावरत आहे
माझी आपणास नम्र विनंती आहे की शहरात व तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती
कायम राखण्यासाठी आपण कठोर उपाय योजना कराव्यात असे लेखी निवेदन युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी दिले.

No comments:

Post a Comment