विकसित बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे गेलेत अनेकांचे जीव..होतेय सुरक्षा उपाय करण्याची मागणी.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 10, 2024

विकसित बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे गेलेत अनेकांचे जीव..होतेय सुरक्षा उपाय करण्याची मागणी.!

विकसित बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट कॉक्रीटीकरणमुळे गेलेत अनेकांचे जीव..होतेय सुरक्षा उपाय करण्याची मागणी.!
बारामती:-विकसित बारामतीत कॅनॉलच्या सिमेंट काँक्रीटीकरण मुळे अनेक जणांचे जीव, मात्र कुठलीही उपाययोजना,सुरक्षा कट्टडे,लोखंडी क्लिपा असं कोणतेही या सिमेंट च्या कॅनॉलला नाही एखादा व्यक्ती पाण्यात पडला तर त्याला वाचविताना किती कसरत करावी लागते हे प्रत्यक्ष दर्शी पाहणारे सांगतील मात्र यामुळे कोणतीच सुरक्षा नसल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहे व आत्ता अजूनही जीव जाण्याची वाट पाहत आहेत की काय अशी परिस्थिती आहे, कॅनॉल लगत नटराज नाट्य मंदिराच्या बाजूने बागेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कॅनॉल असून त्याला कोणत्याही प्रकारचे सुरक्षा ग्रील लावली नसल्याचे कदाचित यामुळे देखील भविष्यात काही धोका होऊ शकतो याची जाणीव काम करणाऱ्या अधिकारी याला असेल की नाही,की बारामतीचा विकास करीत असताना बारामती करांच्या जीवाला धोका असणाऱ्या कॅनॉलला जाळी अथवा सुरक्षा ग्रील लावण्याचा काही मानस आहे का?की फक्त सुशोभीकरण च्या नावाखाली ठेकेदार जगविण्यासाठी चाललेला अट्टाहास आहे हे समजू शकले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे, नुकताच कॅनॉल मध्ये एक जण पडला असता त्याला वाचविताना

किती कसरत करावी लागली हे या बातमीतील व्हिडीओ मध्ये दिसेल यावेळी मात्र बराच प्रयत्न करून काही धाडसी आकाश गायकवाड या  युवकांनी या बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला या धाडसी युवकांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण प्रत्येक वेळी वाचविण्यासाठी कोणी येईल असं नाही त्यासाठी जर कॅनॉलमधून वर येण्यासाठी पकडण्यासाठी काही कट्टडे,लोखंडी ग्रील,खाचा, साखळी असं काहीतरी या घसरणाऱ्या सिमेंटच्या भितीवर लावले पाहिजे ही अनेक दिवसांपासून ची मागणी कधी पूर्ण होऊल हे पाहावे लागेल.

No comments:

Post a Comment