बारामतीत काळ्या काचेखाली दडलंय काय? वाहतूक पोलीस का करतात दुर्लक्ष.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 13, 2024

बारामतीत काळ्या काचेखाली दडलंय काय? वाहतूक पोलीस का करतात दुर्लक्ष..

बारामतीत काळ्या काचेखाली दडलंय काय? वाहतूक पोलीस का करतात दुर्लक्ष..
बारामती:- न्यायालयाकडून बंदी असताना चारचाकी गाडीच्या काळ्या काचा ठेवणे हे अनेक लोकांना शानशौकीन म्हणून आवडते. म्हणूनच चारचाकी गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावली की आपली गाडी उठून दिसते, असे मत अनेक गाडी घेतलेल्या नागरिकांचे झाले आहे. पण या काळ्या काचेच्या नावाखाली अवैध दारू वाहतूक, गुटखा वाहतूक व इतर गैरधंदे सर्रास सुरू आहेत.तसेच अल्पवयीन मुलींना कारमध्ये घेऊन फिरणारे रोमियो अश्या गाड्या घेऊन फिरताना दिसतात कॉलेज, महाविद्यालयाच्या आसपासच्या परिसरात  काळ्या फिल्म लावलेल्या गाड्याची तपासणी केल्यास नक्की काहीतरी निष्पन्न होईल एमआयडीसी परिसरात सर्रास पाहायला मिळते मात्र त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. ऊंचे लोग ऊंची
पसंती या जाहिराती प्रमाणे अनेकांनी मोठ्या
किंमतीच्या चारचाकी गाड्या घेतल्या असून,
त्यावर काळी फिल्म लावली आहे; पण असे
करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार  कारच्या काचेवर काळी फिल्म लावल्यास दंड
आकारण्यात येतो. कारण हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे काळ्या काचेवाले पोलिसांना बायबाय करून त्यांच्या समोरून जात आहे; तर पोलीस त्या गाडीकडे नुसते बघत आहेत. शहराच्या जवळील भागांचे झपाट्याने नागरिकीकरण झाले त्यातच शेतीचे रुपांतर गुंठेवारीमध्ये होऊन हातात पैसा येऊ लागला. त्यामुळे चारचाकी गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन त्यावर काळ्या काचा आल्या.
खऱ्या पण या काळ्या काचेखाली वेगळेच धंदे
सुरू असल्याचे कळतंय, चारचाकी काळ्या काचेवाले पोलिसांना ओळख देऊन जात आहे.
वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असताना मोठ्यांना सुट व गरीबांची लुट अशी अवस्था झाली आहे.कारच्या काळ्या काचा ठेवायच्या असतील, तर नियमानुसार, कारच्या बाजूच्या खिडक्यांवर 50 टक्के विजिबिलीटीसह ब्लॅक फिल्म, तसेच पुढील आणि मागील काचेवर 70टक्के विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावू शकतो, असा नियम आहे; परंतु संपूर्ण गडद काळी फिल्म लावलेल्या गाड्या दिसत असून नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा काळ्या
काचा लावून फिरत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे पोलिसांनी यावर वेळीच कारवाई
करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.

No comments:

Post a Comment