बारामतीत राजकीय पक्षात वशिलेबाजीचा बाजार..कार्यकर्ते नाराज.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 16, 2024

बारामतीत राजकीय पक्षात वशिलेबाजीचा बाजार..कार्यकर्ते नाराज.!

बारामतीत राजकीय पक्षात वशिलेबाजीचा बाजार..कार्यकर्ते नाराज.!
बारामती:-राजकीय वातावरण तापत चालले आहे कधी नव्हे ते झालेली बारामती लोकसभा चर्चेत आली  व आत्ता येणारी विधानसभा चर्चेत येतंय, एकहाती सत्ता बारामतीत असताना एवढा विरोध का वाढला हे बारामती लोकसभा निवडणुकीत दिसला ,महाराष्ट्रात कुठल्या तालुक्यात नसतील एवडी विकासाची कामे बारामतीत केली व चालू आहे मग असं असताना बारामतीत एवढा विरोध होतोय की विधानसभा हातातून जाईल की काय अशी चर्चा होऊ लागली आहे,लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीला विचारलं तरी ते सांगायचे बारामती विधानसभा फक्त अजितदादा पवार..मग आज अशी वेळ का आली की विधानसभेला कोण येईल हे सांगू शकत नाही?याची कधी पक्ष श्रेष्ठींनी विचार केला का?सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी विचारात घेतले का?फक्त आपल्या जवळचा त्याचाच विचार केला जातोय,गटतटाचं,जातीचं राजकारण,पैसावाला,ठेकेदार, घराणेशाही हे पाहिलं जात असल्याचे अनेक पक्षात दिसत आहे, फक्त वशिलेबाजीचा बाजार मांडला गेलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे,आपल्याच मर्जीतील व चमकोगिरी करणाऱ्यारे मात्र अश्या वेळी नेते मंडळी आली की खुर्च्यांवर बसलेले दिसतात हे किती दिवस चालणार आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आपला आहे तो पक्ष वाढीसाठी झटत असतो त्याचा विचार होणार आहे की नाही हे त्यांच्या मनातील असणाऱ्या रागातून लोकसभेत दाखवून दिल्याचं बोललं जात आहे, परत त्याची पूर्णावृत्ती होऊ नये म्हणून चमकोगिरी करणाऱ्या व मलिदा खाणाऱ्या पुढारी पासून नेत्यांनी हातचं राखून राहिलं पाहिजे कारण हेच ऐनवेळी धोका देणारे असतील हे बारामतीकराना चांगलंच माहीत आहे, फक्त वरिष्ठ नेते आले की पुढे येतात मात्र इतर वेळी कुठे गायब असतात हे कळण्याजोगी कार्यकर्ते अडाणी नाहीत अश्या देखील प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे, म्हणूनच बदल हवाय आणि तो आत्ता केला तरच चमकोगिरी, मलिदा खाणाऱ्यावर आळा बसेल.. *क्रमशः.*

No comments:

Post a Comment