खळबळजनक..मंडल अधिकाऱ्यासह तिघांना जमिनीची नोंद करण्यासाठी लाच घेताना पकडले रंगेहाथ..
नोंदीसाठी पैसे घेतले होते या प्रकरणी अर्जदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी
वाले यांनी संभाजी बाबर यांच्यामार्फत दहा
हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वायफळे (ता. तासगाव) येथील एका शेत जमिनीची नोंद करण्याठी सात हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या
कारवाईत मंडल अधिकारी वैशाली प्रवीण वाले, कोतवाल प्रवीण प्रकाश माने आणि खासगी इसम दत्तात्रय ऊर्फ संभाजी बाबर या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.याबाबत तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायफळे येथील एकाने जमीन खरेदी केली होती. या खरेदीची दस्तनोंदणी करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. या अर्जाची सुनावणी मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी अर्जदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी वाले यांनी संभाजी बाबर यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये तक्रारदाराने सात हजार रुपये देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची शहनिशा करून सापळा लावण्यात
आला होता.आज (ता. १) मंडल अधिकारी वैशाली वाले यांच्या सांगण्यावरून लोकसेवक कोतवाल प्रवीण प्रकाश माने याने सात हजार रुपयांची लाच घेत असताना पंचांसमक्ष
त्यांना रंगेहात पकडण्यात आले. वाले, माने आणि बाबर यांच्या विरोधात तासगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
उपअधीक्षक उमेश पाटील यांच्यासह पोलिस पथकाने केली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आले
आहे.
No comments:
Post a Comment