जिजाऊ सेवा संघाच्या प्रदर्शनास प्रतिसाद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 21, 2024

जिजाऊ सेवा संघाच्या प्रदर्शनास प्रतिसाद...

जिजाऊ सेवा संघाच्या प्रदर्शनास प्रतिसाद...
बारामती:- बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने बचत गटाच्या व उद्योजक क्षेत्रातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने सुरू केलेल्या दिवाळी फेस्टिव्हल या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
उदघाटन १८ ऑक्टोबर रोजी शरयू फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते संपन्न झाला व बक्षीस वितरण समारंभ व लकी ड्रॉ विजेत्यांचा सन्मान रविवार २० ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या प्रसंगी  मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे,  कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे ,विश्वस्त देवेंद्र शिर्के, छायाताई कदम,दीपक बागल व उद्योजक सुधीर शिंदे आणि सेवा संघाच्या माजी अध्यक्षा विजया कदम 
जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, उपाध्यक्ष मनीषा शिंदे ,कार्याध्यक्ष सुनंदा जगताप ,सहकार्याध्यक्ष भारती शेळके ,सचिव कल्पना माने, सहसचिव ऋतुजा नलवडे, खजिनदार सारिका मोरे सहखजिनदार मनीषा खेडेकर ,सदस्या विद्या निंबाळकर, राजश्री परजणे, सुवर्णा केसकर, वंदना जाधव, संगीता साळुंखे, गौरी सावळेपाटील, वसुधा उलगडे, उज्वला शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.
ग्रामीण भागातील महिलांना या माध्यमातून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्यनशील असून प्रदर्शन व विक्री  हा एक त्याचा भाग असल्याचे अध्यक्ष स्वाती ढवाण यांनी सांगितले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील ५० उद्योजक महिलांनी भाग घेतला. त्यांच्यामधून भाग्यान विक्रते ,व ग्राहकामधून भाग्यवान ग्राहक यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला व प्रायोजक यांचा सन्मान करण्यात आला.
जिजाऊ सेवा संघाच्या प्रदर्शन माध्यमातून हक्काचे ग्राहक मिळाले व प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने वर्षातून दोन वेळा सदर प्रदर्शन भरवावे अशी मागणी ग्रामीण उद्योजक महिलांनी केली.याप्रसंगी पाककला व बेस्ट कुकिंग स्पर्धा मधील विजेत्या महिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. गायन सलीम सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले  व आभार उपाध्यशा मनीषा शिंदे यांनी मानले

No comments:

Post a Comment