बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अश्या लढतीला येणार रंग..
बारामती :- बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली.युगेंद्र यांच्या रुपाने पवार घराण्यातील पुढची पिढी राजकारणात उतरली.
माध्यमांशी बोलताना युगेंद्र यांनी अजित
पवारांचे नाव न घेता जोरदार टीका करीत
मतदारसंघात ‘भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली'असल्याचा टोला हाणला.युगेंद्र पवारांच्या उमेदवारीमुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत स्पष्ट आहे. युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. संवाद साधताना युगेंद्र म्हणाले, शरद पवार
साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने
माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे
आभार मानतो. मी या निर्णयाचे स्वीकार
करतो. जेवढं मला करता येईल, शेवटपर्यंत
पवार साहेबांचेच काम करेन. संधीचे सोनं
करेल, पवार साहेबांना अभिमान वाटेल,
असे काम करेन, अशी प्रतिक्रिया युगेंद्र
यांनी दिली. अजित पवारांवर नाव न घेता ते म्हणाले की, तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे, 25
गावात प्यायला पाणी नाही. बेरोजगारीची
मोठी समस्या आहे, शेतकऱ्यांचा पिकांना
भाव नाही, शिक्षणावरही जोर दिला पाहिजे.
तालुक्यात भ्रष्टाचार वाढलाय, स्थानिक नेते
खूप भ्रष्टाचार करत आहेत, तो संपवायचा
आहे. गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचारही
वाढले आहेत, ते संपवायचे आहेत, अशी
टीका त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment