बारामती बाजार समितीचे मुख्य यार्ड व सुपे उपबाजार येथे खपली गहु व बाजरीला उच्चांकी दर..
बारामती:- बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवार दि. २४/१०/२०२४ व सुपे उपबाजार येथे झालेल्या भुसार लिलावामध्ये गहु, खपली, बाजरी या शेतमालाला उच्चांकी दर मिळाला. बारामती मुख्य यार्ड मधील आडतदार शिवाजी दादासो फाळके यांच्या आडतीवर शेतकरी विश्वासराव देवकाते, निरावागज यांच्या खपली गव्हाला प्रति क्विंटल रु. ७४००/- व श्री प्रल्हाद लंगुटे रा. फलटण यांच्या गहु या शेतमालाला प्रति क्विंटल ३५००/- मिळाला. तसेच विजय गोलांडे रा. लोणी यांच्या बाजरीस प्रति क्विंटल रू. ३३२१/- असा उच्चांकी दर बारामतीचे बाजार समितीमध्ये लिलावात मिळाला. सुपे उपबाजार येथे आडतदार गणेश ट्रेडिंग कंपनी, श्री. चांदगुडे यांच्या आडतीवर शेतकरी निंबाळकर रा. शिरसगाव काटा यांच्या बाजरीस प्रति, क्विंटल ३४५१/- असा उच्चांकी दर मिळाला.
बारामती बाजार समितीमध्ये बाजरीची आवक फलटण, माण, खटाव या भागामधुन येत असुन ज्वारी, गहु, मका या व इतर शेतमालाची आवक बारामतीसह इंदापुर, दौंड, फलटण या तालुक्यातुन होत आहे. मुख्य यार्ड व सुपे उपबाजार येथे धान्य ग्रेडिंग मशीन असुन त्याचा लाभ सर्व शेतक-यांनी घ्यावा. शेतक-यांनी आपला शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करुन आणल्यास त्याचा चांगला आर्थिक लाभ शेतक-यांना मिळेल. समितीचे आवारात शेतक-यांचा शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा देऊन शेतक-यांना लगेच त्याच दिवशी पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल बारामती बाजार आवारातच विक्रीस आणावा. तसेच बारामती बाजार समिती मध्ये शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु असुन मुग, उडीद, सोयाबिन या शेतमालाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु आहे. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली नाही. त्यांनी नोंदणी करुन हमीभाव केंद्राचा फायदा घ्यावा अशी माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
No comments:
Post a Comment