धक्कादायक..फास्ट गाडी चालविल्याच्या रागातून कोयत्याने तरुणावर वार करुन खून...
पुणे :- नुकताच बाईकने कट मारला म्हणून कोयत्याने वार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस
आली आहे. शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ
झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता केवळ गाडी वेगाने नेली, या कारणावरुन तिघा अल्पवयीन मुलांनी तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे.
ही घटना शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी गणेशनगर येथील परिसरात सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अक्षय मारुती किरवले (वय २०, रा.गणेशनगर, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आरोपी
एकाच वस्तीत राहतात. अक्षय एका स्वीट मार्ट येथे काम करत होता. ही अल्पवयीन मुले आणि अक्षय यांच्यात फास्ट गाडी नेल्यावरुन वाद झाला होता.दरम्यान, आरोपींनी याचाच राग मनात धरून अक्षय याच्या घरासमोर तिघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.गंभीर जखमी झालेल्या अक्षय याचा मृत्यु झाला आहे. या
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment