काय सांगता..२२ वर्षीय तरुणाने एका बाळाला जन्म दिल्याचा दावा?काय आहे हा प्रकार..
बुलढाणा:- तरुण युवकाने बाळाला जन्म दिल्याचा दावा समोर आला व तो कसा उघड झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की,जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव
देशमुख येथे या गावातील एका २२ वर्षीय तरुणाने एका बाळाला जन्म दिल्याचा दावा केला आहे. अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी येथे धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी युवकावर डोनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुमित सुधीर सदार असं या तरुणाचं नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून
आपला दरबार भरवत होता. तसेच आपल्या भक्तांना मी गरोदर असल्याचं सांगायचा. या तरुणाने ९ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यातील आपले गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा
रंगली होती. या तरुणाने पुढे प्रसूती झाल्याचे बाळासोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल केले.शिवाय ९ महिन्यांच्या काळात मी उत्तम स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेतला असा दावा देखील त्याने केला होता.अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाचं पितळ उघडं पाडलं आहे. त्यांनी याचा शोध घेत पोलिसांत त्याबद्दल तक्रार दाखल केलीये पोलिसांच्या मदतीने या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.तपासात अशी माहिती समोर आली की, दावा केलेलं लहान बाळ भुसावळ येथून एका भिक्षेकरी महिलेकडून आणल्याचं तरुणाने सांगितलं. पोलिसांनी सुमित सदारवर
कलम 137 (2), 93, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच या व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे.
No comments:
Post a Comment