निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार यांनी घेतला बारामती विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा आढावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 30, 2024

निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार यांनी घेतला बारामती विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा आढावा..

निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार यांनी घेतला बारामती विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा आढावा..
बारामती, दि.३०: भारत निवडणूक आयोगाकडून बारामती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज तहसील कार्यालय येथील बारामती विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट देवून निवडणूक खर्चाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, नायब तहसीलदार पूनम दंडिले आदी उपस्थित होते.
श्री. कुमार म्हणाले, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवाव्यात. अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. तसेच निवडणूक खर्च कक्ष, माध्यम कक्ष तसेच आदी कक्षातील समन्वय अधिकाऱ्यांना कामकाजाच्या अनुषंगाने श्री.कुमार यांनी सूचना केल्या. 
श्री. सुमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०२ असा असून  संपर्क क्रमांक ९६०७०३५९१८ असा आहे. निवडणूक खर्च  निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी  श्री. गणेश सस्ते  हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे.  श्री. कुमार यांना सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे नागरिकांना भेटता येईल, असे बारामती  विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नावडकर यांनी माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment