बारामतीतील भंगार गोडाऊनमध्ये होत असलेल्या प्रदूषणमुळे स्थानिक रहिवासी हैराण, कारवाईची मागणी..
बारामती:- बारामती येथील फलटण रोड मारूती शोरूम मागे मुल्लावस्ती येथे काही परप्रांतीय लोक हे भंगार माल, जुने खराब झालेले टायर जाळुन प्रदुषण करीत असलेने संबंधीतांना कारवाई होणेबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता याबाबत या अर्जात म्हंटले आहे की,आम्ही सर्वजण सदर परिसरात सन २०२१ पासून वास्तव्यास आहोत. सदर ठिकाणचे घरपट्टी आम्ही नियमितपणे भरीत आहोत. परंतु सदर परिसरात परप्रांतीय लोक हे भंगार माल व जुने खराब झालेले टायर जाळत असुन, त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे येथील
रहिवासी विशेषतः लहान मुले वयोवृध्द ज्येष्ठ नागरीकांना खुपच त्रास होत आहे. सदर परिसर हा रहिवासी क्षेत्र असुन, त्या ठिकाणी परप्रांतीय लोक हे मोठमोठी बेकायदेशीर भंगाराची गोडावुन उभी करून सदरच्या परिसरातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.तरी वरील सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून सदर पसिरातील परप्रांतीय लोकांचे भंगारची गोडावुन तेथुन त्वरीत लवकरात लवकर हलविण्यात येवून तेथील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळणारे संबंधीतांवर कडक कायदेशीर करण्यात यावी ही विनंती.
अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल याची आपण गंभीर दखल घ्यावी यासाठी या परिसरातील रहिवासी नागरीक यांनी लेखी तक्रार बारामती नगरपरिषदेकडे केली असून याबाबत कधी दखल घेतील अशी आशा येथील रहिवासी करीत आहेत, दुसरीकडे काही आर्थिक देवाण घेवाण करून पाठीशी घालण्याचे काम होत नाही ना असा संशय व्यक्त करण्यात आला.मुख्याधिकारी
बारामती नगरपरिषद,व पोलीस स्टेशन बारामती यांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment