सर्वत्र अवैध धंदे सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड,अनेकांना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 26, 2024

सर्वत्र अवैध धंदे सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड,अनेकांना अटक..

सर्वत्र अवैध धंदे सुरु असल्याचे पोलिसांच्या
 कारवाईने उघड,अनेकांना अटक..
पुणे:- शहरातील सर्व अवैध धंदे बंद
असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते.मात्र, आचार संहिता लागू होताच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली. त्यातून शहरात सर्वत्र हातभट्टी दारु विक्री, बेकायदेशीर मटका,जुगारचे अड्डे सर्रासपणे सुरु असल्याचे दिसून आले. दररोज पोलीस अनेक बेकायदा दारु धंदे व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी शहर पोलीस दलाने चार ठिकाणी धाडी टाकून मटका किंग नंदू नाईक याच्यासह अनेकांना अटक करुन लाखो रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवार पेठेतील रौनक बार अँड रेस्टोचे वरील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये खडक पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. मटका किंग नंदू नाईक याच्या सांगण्यावरुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन कल्याण, वरळी, मुंबई नावाचे मटका जुगार खेळत असताना चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ हजार १०५ रुपयांचे साहित्य जप्त केले. चरण भारत देवघे (वय ३६, रा. वाघजाईनगर,कात्रज), करण जितेंद्र मोदी (वय ३०, रा.बालाजीनगर, कात्रज), किरण विठ्ठल खाळुंखे(रा. बालाजीनगर) आणि मटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक (रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली आहे.रास्ता पेठेतील कुमार सदर बिल्डिंगजवळील बोळामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा घातला.कल्याण ओपन नावाचा मटका खेळत असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून ५ हजार ५० रुपये रोकड व जुगाराची साधने जप्त केली.संदीप लक्ष्मण चव्हाण (वय ३४, रा. कसबा पेठ),नजीर सईद अली शेख (वय ३७, रा. मंगळवार पेठ), रुपेश राजेंद्र नाईक (वय ४०, रा. सोमवार पेठ), सतिश आत्माराम जाधव (वय ५०, रा.कसारा हाऊस) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. 
पुणे स्टेशन रोडवरील ससून हॉस्पिटल,
गेटच्या समोर फुटपाथवर सुरु असलेल्या मटका
जुगारावर बंडगार्डन पोलिसांनी छापा घातला.
गजेंद्र बसवणप्पा यागंटी (वय ५०, रा. गायकवाड
रा, वडगाव शेरी) याला अटक केली आहे. या
जुगार धंद्याचा मालक राहुल शेळके याच्या
आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारुन
कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत व खेळत
असताना त्याच्याकडून १३८० रुपये रोकड व
जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवार पेठेतील जनसेवा इमारतीमध्ये टेरसवरील नंदू नाईक याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा घालून ६० जणांना ताब्यात घेतले.तेथून १ लाख रुपयांची रोकड जप्त केली.

No comments:

Post a Comment