बारामतीत टी.सी.कॉलेज परिसरात सुरू झाली पोलीस चौकी..वाढतोय तक्रारीचा ओघ.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 4, 2024

बारामतीत टी.सी.कॉलेज परिसरात सुरू झाली पोलीस चौकी..वाढतोय तक्रारीचा ओघ.!

बारामतीत टी.सी.कॉलेज परिसरात सुरू झाली पोलीस चौकी..वाढतोय तक्रारीचा ओघ.!
बारामती:-बारामतीत वाढती गुन्हेगारी पाहता शहरातील वसंतनगर, टी सी कॉलेज परिसर,व्हील कॉलनी व प्रगती नगर परिसर अवधुतनगर,तांदूळवाडी रोड लगत,सातव चौक या परिसरातील नागरिकांची मागणी होती की या भागात पोलीस चौकी असणं गरजेचं  होतं त्याअनुषंगाने गेली दोन तीन दिवसांपासून टी सी कॉलेज लगत पोलीस चौकी सुरू झाली याबाबत या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले, नुकताच घडलेल्या कॉलेज मधील खुनाची घटना या भागातील नागरिक दहशतीत होती ,पालक वर्ग, विद्यार्थी यांना आत्ता कुठेतरी दिलासा मिळाला आहे ही पोलीस चौकी चालू झाल्यापासून अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत, त्याची दखल घेण्याच काम पोलीस कर्मचारी अनिल सातपुते व महिला पोलीस रुपाली पवार यांनी सुरू केलं असून ते आलेल्या तक्रारींचे, समस्येवर न्याय देण्याचं काम करीत असल्याने त्यांचे पालक वर्गानी स्वागत केलं, या कामी अप्पर पोलीस अधीक्षक बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक नाळे यांचे आभार मानत आमच्या मागणीची दखल घेतली जातेय याबाबत कौतुक केले.

No comments:

Post a Comment