धक्कादायक.. बारामतीत अल्पवयीन मुलीवर कारमध्येच बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 5, 2024

धक्कादायक.. बारामतीत अल्पवयीन मुलीवर कारमध्येच बलात्कार..

धक्कादायक.. बारामतीत अल्पवयीन मुलीवर कारमध्येच बलात्कार..
बारामती:-महिला व अल्पवयीन मुलींवर  अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने शहर पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. शारदानगर, माळेगाव येथे रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी हा प्रकार घडला.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनिरुध्द उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा. चंद्रमणीनगर, बारामती)याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात शारिरिक शोषण,पॉक्सो, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिडीत मुलगी हि महाविद्यालयात येत असताना आरोपी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत असे. तेथे पिडीतेला बोलावून कारमध्ये
बसवून सोबत घेवून जात होता. तसेच महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता. तेथे तिला मारून टाकीन अशी धमकी देऊन कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment