बारामतीत महिला सुरक्षितेच्या हेतूने"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" हेल्पलाईन अजित पवारांनी केली घोषणा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 3, 2024

बारामतीत महिला सुरक्षितेच्या हेतूने"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" हेल्पलाईन अजित पवारांनी केली घोषणा...

बारामतीत महिला सुरक्षितेच्या हेतूने"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" हेल्पलाईन अजित पवारांनी केली घोषणा...
बारामती:- बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व त्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 'एक कॉल, प्रॉब्लेम
सॉल्व्ह'; २४ तास हेल्पलाईन नंबर;महिला सुरक्षितेसाठी 'शक्ती अभियान' सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत अजित
पवार यांनी सांगितले पुढे ते  म्हणाले  की, "शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय
आम्ही घेतला आहे. यात महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा
आणि युवकांचे प्रबोधन या अभियान केलं जाणार आहे.राज्यात वाढती गुन्हेगारी
म्हणजेच अल्पवयीन मुलींवर होणारे
बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड
प्रकरण या सगळ्यांवर उपाय म्हणून
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा
निर्णय घेतला आहे.
राज्यात तथा बारामतीत जशा घटना
घडतायत अशा घटना घडायला नको, याची
काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने
उचलण्याची गरज आहे. सकाळी
बारामतीमधल्या सर्व वरिष्ठ पोलिस
अधिकाऱ्यांशी माझी बैठक झाली. "शक्ती
अभियान सुरु करण्याचा निर्णय आम्ही
घेतला आहे. यात महिलांचा सन्मान,
पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन या
अभियान केलं जाणार आहे. कारण
युवकांना सध्या प्रबोधन करण्याची फार गरज
आहे.कॉलेज मधील घटनेत  सर्व व्यक्ती १७ वर्षांमधली
असल्यामुळे, म्हणून मी त्यांची नावं सांगणार
नाही. अल्पवयीन आरोपींची नावं सांगायची
नसतात, असं पोलिसांचं मत आहे. हे जे
अभियान आहे यात पंचशक्ती आहे.
शक्तीबॉस अशा प्रकारची एक तक्रारपेटी
आहे. अनेक महिला तथा मुलींना 
अडचणींबाबत म्हणजे मुलांकडून होणारा
पाठलाग, छेडछाड, कधीकधी चावटपणे मुलं
दुसऱ्याच फोनवरुन फोन करतात. त्यांचा त्या
मोबाइलवर नंबर येत किंवा त्यांची ओळख
पटत नाही. असे काही प्रकार चालतात,
त्यामुळे पीडित महिला किंवा मुलींना
मनमोकळेपणाने त्यांना ही गोष्ट सांगता येत
नाही. अशा पीडितांना आपलं म्हणणं किंवा
आपली तक्रार मांडता यावी, यासाठी
परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी
कार्यालय, खासगी कंपन्या, हॉस्पिटल,
एस.टी. स्टॅण्ड, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफिस याठिकाणी
पोलिसांमार्फत शक्तीबॉक्स तक्रारपेटी
ठेवण्यात येईल", असं अजित पवार म्हणाले.यामध्ये
नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे,
"सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार,
छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही
संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध
गांजा, गुटखा इत्यादींचा साठा सापडल्यास  याबाबतची गोपनीय माहिती तक्रारपेटीत
टाकल्यानंतर पोलिसांमार्फत सदरची पेटी
उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर
योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच
संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय
ठेवण्यात येईल. कारण बारामती शहर वाढत
आहे. बारामतीची आता जिल्हा म्हणूनच
ओळख झालेली आहे. पुणे, पिंपरी-
चिंचवडनंतर बारामतीचा नंबर लागतोय.
बारामतीत या सर्व गोष्टी होत असताना
शहरातील कायदा सुव्यवस्था चांगली
ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात
देखील नागरिकांनी प्रतिसाद दिला,शहरात बऱ्याच घटना घडत असतात.
सामान्य माणूस याबाबत तक्रार किंवा
आवाज उठवायला घाबरतो. त्यासाठीच
आपण हे 'शक्ती अभियान' तथा 'शक्तीबॉक्स
तक्रारपेटी अभियान' राबवत आहोत.
त्याचबरोबर एक शक्तीनंबर देखील तयार
केला आहे. "एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" असं
स्लोगन त्याला दिलंय. तो नंबर
'९२०९३९४९१७' या क्रमांकाची सेवा सातही
दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे. या नंबरवर फोन किंवा मेसेज करुन
तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार
आहे. तसेच संबंधितांचं (तक्रारदारांचे) नावे
देखील गोपनीय ठेवण्यात येतील. सदर
पथकाचा मोबाईल बारामतीमधल्या शाळा,
कॉलेज, सरकारी व खासगी संस्था, कंपनी
आणि हॉस्पिटल यांच्या मध्यदर्शनीय ठिकाणी
लावून त्याद्वारे मिळालेल्या तक्रारीचं
निराकरण करण्यात येईल, असंही अजित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत 
म्हणाले.

No comments:

Post a Comment