अबब..पोलिसानेच महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार..
यवतमाळ:- सद्या सगळीकडे महिला व मुलीवर अत्याचार होत असलेल्या बातम्या वारंवार ऐकव्यास येत असताना ज्याच्याकडे न्याय मागायचा त्यानेच अत्याचार केला तर अशीच घटना घडली असल्याचे माहिती समोर आली,पोलिसाने पतीपासून विभक्त झालेल्या
महिलेला प्रेमजाळ्यात ओढून लग्न करण्याचे
आमिष दाखविले. त्यानंतर विश्वासात घेऊन तिच्यावर अत्याचार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी रात्री पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने पोलिस वर्तुळात खळबळ
उडाली आहे. इम्रान अजीज पठाण (३८, रा. बोरेले ले-आऊट) असे गुन्हा नोंद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचेनाव आहे. तो लोहारा पोलिस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. महिला २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात तारखेवर येत असताना तिची ओळख इम्रान याच्याशी झाली. फोनवर बोलताना मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
यानंतर त्याने पडीत महिलेला आयुष्यभर साथ देईल,तुझ्याशी लग्न करेल, असे आश्वासन देत शहरातील घाटंजी बायपासवर नेऊन महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि अत्याचार केला. काही दिवसांनंतर मी तुझी बायको आहे. दरमहा खर्चाची मागणी करताच पोलिस कर्मचाऱ्याने
भेटणे आणि बोलणे कमी केले. महिलेने इम्रान याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइल तसेच इन्स्टावरूनही ब्लॉक केले. २०२१ ते ५ जून २०२४ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून कारमध्ये नेत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे. त्यावरून इम्रान पठाण याच्याविरुद्ध
विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची व अधिक तपास चालू असल्याचे माहिती ठाणेदार नरेश रणधीर यांनी दिली.
No comments:
Post a Comment