जिजाऊ सेवा संघाच्या पाककला स्पर्धेत 'मोनिका आगवणे' प्रथम..
बारामती:(प्रतिनिधी):- बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने नवरात्र निमित्त भोंडला, व दांडिया पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, पोर्णिमा तावरे व मा. सभापती डॉ.सुहासनी सातव आणि छाया कदम, संगीता शिर्के, कल्पना शिंदे , जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्षा स्वाती ढवाण,उपाध्यक्षा मनीषा शिंदे,कार्यध्यशा सुनंदा जगताप, व भारती शेळके,कल्पना माने, ,वीणा यादव, विद्या नींबाळकर,सारिका मोरे, वंदना जाधव,सुवर्णा केसकर, ऋतुजा नलवडे, पूजा खलाटे ,संगीता साळुंखे ,गौरी सावळेपाटील,राजश्री परजने,मनीषा खेडकर आदी मान्यवर उपस्तीत होत्या भोंडला स्पर्धेसाठी देवी व हत्तीचे च्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. दांडिया व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम मोनिका आगवणे द्वितीय हर्षदा मोरे तृतीय छाया पाटील, उत्तेजनार्थ सोनल बाबर, कलावती चितारे, प्रीत बवेजा यांनी पाककला स्पर्धेत बाजी मारली .
अत्याधुनिक युगात भारतीय संस्कृती सण, उत्सव, परंपरा आदी विसर पडू नये व महिलांच्या कला,गुणांना वाव मिळावा या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे
अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुनंदा जगताप व भारती शेळके यांनी केले. आभार उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी मानले
No comments:
Post a Comment