*नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार लाभ मिळावेत*-*मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याची युगेंद्र पवार यांची ग्वाही* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 8, 2024

*नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार लाभ मिळावेत*-*मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याची युगेंद्र पवार यांची ग्वाही*

*नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार लाभ मिळावेत*-
*मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याची युगेंद्र पवार यांची ग्वाही*
बारामती : बारामती नगर परिषदेत रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सन १९८५ मधील लाड समितीच्या शिफारशीस नुसार वारस हक्काने नोकरी मिळावी, अशी मागणी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी केली आहे. त्यासाठी आपण स्वतः या कर्मचार्यांसोबत मंत्रालयात जाऊन सविस्तर माहिती घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

संबधीत सफाई कर्मचाऱ्यानी बारामती नगर परिषदेसमोर आंदोलन केले. त्याठिकाणी भेट देत युगेंद्र पवार यांनी त्यांची समस्या जाणून घेतली; आणि तोडगा काढण्यासाठी आपण मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांना दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती शहर महिला अध्यक्ष आरती शेंडगे - गव्हाळे उपस्थित होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांतील युवराज खिराडे, पिंकी मोरे, मोहन बिरलिंगे, स्वप्निल आढागळे, राजू शेख, इकबाल शेख, आणि अन्य कर्मचाऱ्यानी त्यांच्या अडचणी सांगितल्या. 

बारामती नगर परिषदेत सन १९८५ सालापासून ते सर्वजण सफाई कामगार म्हणून सेवेत आहेत.  त्यांना आयुक्त व प्रादेशिक संचालक नगर परिषद यांच्या आदेशानुसार कायम करण्यात आले होते. मात्र सन २००५ पासून सफाई कामगारांच्या  वारसांना नोकरीचा दुहेरी फायदा घेता येणार नाही, असे नमुद करून त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आले होता. तथापि २४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाने कलम ३ मधील तरतुदीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची तरतुद पुन्हा केली आहे. या तरतुदीनुसार त्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याचा हक्क मिळाला असून त्यांची मागणी पूर्ण करण्यात यावी, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment