बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास जन्मठेप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 22, 2024

बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास जन्मठेप...

बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास जन्मठेप...
बारामती:- दिनांक २२/१०/२०२४ रोजी बारामती येथील मे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मा. अ. अ. शहापुरे साहेब यांनी आरोपी संतोष भिमराव कांबळे वय वर्षे ३७, रा. रणगांव वालचंदनगर, ता. इंदापुर जि. पुणे यांस अल्पवयीन पिडीत मुलगी
(वय ९ वर्षे ) हीचेवर बलात्कार केल्याप्रकरणी आजीवन सश्रम कारावास, त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरीत काळापर्यंतचा भोगण्याची शिक्षा केली आहे.गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १५/१०/२०१६ रोजी आरोपी
संतोष भिमराव कांबळे हा त्याच्या नातेवाईकाच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथे आलेला होता. त्यादिवशी संध्याकाळी ६ वाजणेच्या सुमारास त्याने पिडीत मुलीस यात्रेतील उडया मारणा-या भावल्यावर
बसवतो, तसेच तुझे मामाने पाण्याची बाटली आणायला सांगितली आहे असे म्हणून पिडीत मुलीच्या हातात १००/- रुपयाची नोट देवून तीस जबरदस्तीने त्याच्या मोटार सायकलवर बसवले व तीला मौजे कटफळ ते गाडीखेल जाण-या रोडच्या उत्तरेस असलेल्या कल्याणी कंपनीच्या लगतच्या फॉरेस्टच्या लगत असलेल्या पडीक
जमिनीमध्ये नेवून त्या ठिकाणी तिस जिवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर तिन वेळा
जबरदस्तीने बलात्कार केला व त्यानंतर तीस पुन्हा मोटार सायकलवर बसवून तिस कटफळ गावात आणून सोडले. त्यावेळी तिची आजी तिचा गावात शोध घेत असताना पिडीत मुलगी रस्त्यावर मिळून आली. तिने आजीस घडलेला प्रकार सांगितला व आरोपीसही दाखवले. पिडीत मुलगी गावातील यात्रेसाठी तिच्या आजीकडे आली होती. ती दुकानातून कुरकुरे / खाउ घेवून तिच्या आजीच्या घरी तिला रस्त्यामधे अडवून तिस मोटार सायकलवर बसवून घेवून
जात असताना तिस वरील ठिकाणी नेले व तिच्यावर बलात्कार केला होता,याबाबत त्याच दिवशी पिडीत मुलीच्या आजीने आरोपीविरुध्द बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली होती.आरोपीने केलेल्या लैंगिक
तिच्यावर बारामती येथील अत्याचारामुळे पिडीत मुलीची प्रकृती गंभीर झाली होती.सरकारी दवाखाना व त्यानंतर ससून रुग्णालय पुणे येथे औषधोपचार करण्यात आले होते. सदरील गुन्हयाचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक श्री. सी.जी. कांबळे यांनी केला व आरोपी विरुध्द पिडीत मुलीवर बलात्कार केल्याबाबत दोषारोप पत्र बारामती येथील न्यायालयात दाखल केले होते. सदरील फौजदारी खटल्याचे कामकाज शासनातर्फे श्री. संदिप ओहोळ विशेष सरकारी वकील यांनी चालविले. त्यांनी या प्रकरणांत एकूण ०९ साक्षीदार तपासले.यामध्ये पिडीत मुलगी, तिची आजी, वैदयकीय अधिकारी, पिडीत मुलीस आरोपी मोटार सायकलवरुन घेवून जाताना पहाणारे साक्षीदार तसेच तपासी अधिकारी यांची आरोपीने गुन्हा साक्ष व डी.एन.ए. अहवाल केस शाबीतीकामी महत्वाचा ठरला.केल्याचे सिध्द झाले असून, आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर व निंदनीय
असल्याने आरोपीस आजीवन जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी व युक्तीवाद विशेष सरकारी वकील श्री. संदिप ओहोळ यांनी केला होता. तो मान्य करुन मे. न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ (२) अन्वये सश्रम आजीवन कारावास त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरीत काळापर्यंतचा भोगण्याची व ३ हजार
रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली. तसेच पोक्सो कायदा कलम ६ अन्वये सश्रम आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिलेबाबत भा.द.वि. कलम ५०६ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेश करुन निकाल दिला. दंडाची रक्कम पिडीत मुलीस देण्याचा व सदरची रक्कम तुटपुंजी असल्याने सचिव, जिल्हा विधी सेवा समिती पुणे यांनी पिडीतेस कायदयान्वये नुकसान भरपाई रक्क्म देणेची शिफारस केली.सरकारी वकील यांना केसकामी केस अधिकारी श्री. दत्तात्रय लेंडवे पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती वैशाली पाटील पोलीस निरीक्षक, श्री. अभिमन्यु कवडे सहा.फौजदार बारामती तालुका पोलीस स्टेशन, कोर्ट पैरवी अधिकारी श्री. नामदेव नलवडे
पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment