इंदापुरची पूर्णावृत्ती होईल का बारामतीत..भाजपचे कोणते नेते जाणार तुतारीत?..चर्चेला उधाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 9, 2024

इंदापुरची पूर्णावृत्ती होईल का बारामतीत..भाजपचे कोणते नेते जाणार तुतारीत?..चर्चेला उधाण..

इंदापुरची पूर्णावृत्ती होईल का बारामतीत..भाजपचे कोणते नेते जाणार तुतारीत?..चर्चेला उधाण..
बारामती:-विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे, कधीही निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण तश्या पद्धतीने वातावरण होत असल्याचे दिसत आहे, राजकीय घडामोडी बदलताना दिसत आहे, बडे नेते आपल्या पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षाकडे चालल्याचे दिसत आहे. यामुळे आत्ता नेत्यामागील कार्यकर्ता मात्र कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात आहे.अशीच काहीशी अवस्था बारामती लोकसभा मतदार संघात पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांची झालीय. तर दुसरीकडे मात्र काही कार्यकर्ते आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्यांची अवस्था काय झालीय याची पक्ष श्रेष्टी केव्हा दखल घेतील हे येणाऱ्या काळात कळेल, नुकताच हरियाणा निवडणुकीत तिसऱ्यांदा यश मिळाले बद्दल बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून लाडू वाटप करीत आनंद साजरा केला परंतु यामध्ये भाजपचे नेते दिसत नव्हते यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली असावी हे मात्र नक्की.  परंतु आज तरी प्रामाणिक कार्यकर्ते थोडे असले तरी ते एकनिष्ठ राहतील हे मात्र खरं असेल पण ज्यांना पक्षाने भरपूर दिलं ते आज पक्ष सोडतायेत तेही कुठं उमेदवारी तर कुठं संस्थेवर पदावर येण्यासाठी अशीच चर्चा बारामतीत देखील होत आहे, इंदापूर मध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) तुतारीकडे गेले तर दौड, फलटण मधील नेते आपला पक्ष सोडून तुतारी कडे जाण्याची चर्चा चालू आहे अशीच चर्चा बारामतीत देखील भाजपचे नेते तुतारीत जाण्याच्या हालचाली चालू असल्याचे बोलले जात आहे, जर असं असेल तर मूळ प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काय भूमिका घ्यायची याचा विचार होईल मात्र एकीकडे महायुती असताना बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने कार्यकर्ते नाराज असून दुसरीकडे नेते जर दुसऱ्या पक्षाकडे जाण्याची चर्चा होत असेल तर पक्ष श्रेष्टी या बाबत कार्यकर्त्यांना बळ देणार का?की येणाऱ्या निवडणूकित भाजप आपल्या पक्षाचा उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत ठोस निर्णय लवकरात लवकर घ्यावा कारण कोण कधी पक्ष सोडून जाईल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते बोलताना देत आहे.

No comments:

Post a Comment