बारामती बाजार समिती मध्ये शासकीय उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 4, 2024

बारामती बाजार समिती मध्ये शासकीय उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू..


बारामती बाजार समिती मध्ये शासकीय उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू.. 
बारामती:-बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमीदर खरेदी केंद्र  सुरू करणे बाबतच्या प्रस्ताव दि. ९/९/२०२४  रोजी मा. जिल्हा उपनिबंधकसो, पुणे व मा.जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत मुग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारामती साठी मंजुर झाले असुन त्याकरिता शेतकरी नाव नोंदणी प्रक्रिया दि. १ ऑक्टोबर २०२४ च्या पत्रानुसार सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली. सदर केंद्रावर नाफेड मार्फत सोयाबीन प्रति क्विंटल  रू. ४८९२/- व उडीद रू. ७४००/- आणि मुग रू. ८६८२/- प्रति क्विंटल या हमीदराने शासन खरेदी करणार आहे. सध्या मुग, उडीद व सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला असुन बाजार आवारात नवीन शेतमालाची आवक सुरू झाली आहे. बाजार आवारात मागणी व पुरवठा यानुसार दर निघतात. वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाचा माल हमीदराने विक्रीची सोय करावी म्हणुन बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. सदर केंद्र सुरू झाले असल्याने शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करणेत येत आहे.
या केंद्रावर शेतक-यांनी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार शेतक-यांनी जो शेतमाल विक्री करावयचा आहे त्याची नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरा सहीत ७/१२ उतारा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. शासनाने दिलेल्या कालावधी नुसार दि. १५/१०/२०२४ पर्यन्त  शेतक-यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती (प्रशांत मदने) येथे नाव नोंदणी करावयाची आहे. बारामती मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाईन नाव नोंदणी झालेल्या शेतक-यांचा शेतमाल दि. १५/१०/२०२४ पासुन समितीचे यांत्रिक चाळणी येथे खरेदीस सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवुन आणावा असे सचिव अरविंद जगताप यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment