हादरणारी घटना.. गावच्या पोलीस पाटीलाने केला १४ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार..
रायगड:-महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच रायगडमधील पेन तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. गावातील पोलीस पाटलानेच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पेण तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.रमेश अंबाजी पाटील (वय ६२) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित मुलीच्या
वडिलांसोबत चांगली मैत्री आहे. याचाच फायदा घेऊन त्याने पीडितेवर बलात्कार केला. याविषयी कुणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकीही दिली. घडलेल्या प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने याची वाच्यता कुणाकडेही केली नाही. याच गोष्टीचा फायदा
घेऊन आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी हा पीडितेचे लैंगिक शोषण करत होता. त्यासाठी त्याने तिला पेण तालुक्याच्या बाहेरदेखील नेले होते. पीडित मुलगी पूर्णपणे आरोपीच्या वासनेची शिकार झाली होती.आरोपीकडून वारंवार लैंगिक शोषण होत असल्याने पीडितेला वेदना असह्य झाल्या. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार धाव घेत तक्रार दाखल
केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला आहे. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध चालू आहे.
No comments:
Post a Comment