बारामतीत नक्की चाललंय काय.. एक दोन नव्हे तर चक्क 17 कुटुंब ऊस तोड कामगार टोळीला ओलीस ठेवून खंडणी मागणार्यावर अखेर गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 10, 2024

बारामतीत नक्की चाललंय काय.. एक दोन नव्हे तर चक्क 17 कुटुंब ऊस तोड कामगार टोळीला ओलीस ठेवून खंडणी मागणार्यावर अखेर गुन्हा दाखल...

बारामतीत नक्की चाललंय काय.. एक दोन नव्हे तर चक्क 17 कुटुंब ऊस तोड कामगार टोळीला ओलीस ठेवून खंडणी मागणार्यावर अखेर गुन्हा दाखल... 
बारामती:-बारामतीत एक दोन नव्हे तर चक्क   17 कुटुंबे ओलीस ठेवून चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.सविस्तर हकीकत अशी की 15 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार हुन पाटस बारामती पालखी महामार्ग रोडने दोन ट्रक मधुन ऊस तोडमजूर कागवाड जिल्हा बेळगाव येथे निघालेले ट्रक बारामती ता शिरसुफळ फाटा येथून जात असताना अज्ञात स्कॉर्पिओ चार चाकी वाहन इतर चार दुचाकी मधील साधारण 18 जणांनी
फिल्मी स्टाईलने ऊसतोड मजुरांच्या दोन ट्रक अडवून ट्रक मधील ऊसतोड मजुरांना लाकडी दंडुका दाखवीत शिवीगाळ दमदाटी करून जबरदस्तीने त्यांच्यासोबत तालुक्यातील गाडीखेल येथे नेले तेथे तेथे त्यांना त्यांना त्यांच्या  अन्नसामग्रीसह लहान मुलांसह अशा 17 कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देऊन
ओलीस ठेवून त्यांच्या मुकादामाकडे चार
लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा
प्रकार घडला आहे.या प्रकरणी राहुल अंकुश गाढवे ( रा.गाडीखेल ता. बारामती), संजू पुना
सोनवणे (रा. वैदाने जि. नंदुरबार), राजेंद्र
नांगरे पूर्ण नाव माहित नाही (रा.पारवडी, बारामती) शक्ती नारायण,गाढवे, नवनाथ मारुती गाढवे, बापू अशोक धायतोंडे व इतर दहा ते बारा
इसम असे 18 जणांविरुद्ध तालुका
पोलीस ठाण्यात दमदाटी करणे आणि
खंडणी प्रकरणी  भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023,140(2),189(2),191 (1),352,351 (2),351 (3),3(5) व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्याद संतोष बनसोडे यांनी दिली आहे.याबाबत बारामती तालुका ग्रामीण पोलीस  तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment