*मलिदा गॅंग* मुळे लोकसभेची पूर्णावृत्ती होईल काय बारामती विधानसभेत?
बारामती:-विधानसभा निवडणुक रंगात येत असून महायुती व महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच रंगत आली असून या निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब अजमावण्याचं सद्या उमेदवार तयारीत आहे, अशातच बारामती ही जी देशात रस्त्यात गाजत आहे ती पवार विरुद्ध पवार निवडणूकीमुळे व त्यातच चुलता पुतणे एकमेकांविरुद्ध बारामती विधानसभा निवडणुक लढवीत आहेत, नुकताच बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेद्रावहिनी पवार अशी लढत झाली यामध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या तुतारीला मतदारांनी भरघोस मताने निवडून दिले हे सर्वांना माहीत आहे व त्याची कारणे देखील पुढे आली यात प्रामुख्याने सर्वात जास्त चर्चेत असलेला *मलिदा गॅंग* पुढे आला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीचा कायापालट केला खरा पण त्यामध्ये प्रामुख्याने *मलिदा गॅंग* याचा शिरकाव जास्त झाला असल्याचे विरोधकानी प्रचारात अनेक वेळा मुद्दा मांडल्याचे दिसले.त्यामुळे नाराज कार्यकर्ते व मतदार यांनी अश्या *मलिदा गॅंग* लोकांवर नाराजी म्हणून मतपेटीतून नाराजी दाखवून दिली अशीच सगळीकडे चर्चा होती, पुन्हा विधानसभा लागली असून हेच *मलिदा गॅंग* सक्रिय झाल्याने कार्यकर्ते व मतदार नाराज असल्याचे कळतंय आत्ता तरी वेळ गेलेली नाही कुठेतरी बदल करावा अन्यथा पुन्हा लोकसभेची पूर्णवृत्ती विधानसभेला होऊ नये हीच चर्चा सद्या होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment