आत्तातरी अजितदादांनी सावध राहावं....
बारामती:-बारामती लोकसभा झाली आत्ता बारामती विधानसभा निवडणुक जाहीर झाली या मध्ये राजकीय वातावरण तापत असून प्रचार शिगेला पोहचला आहे, पवार विरुद्ध पवार अशी लढत सुरू झाली खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग आल्याचं मतदार बोलताना दिसत आहे,मात्र यावेळी प्रामुख्याने मागील वेळी झालेल्या काही निवडणुकीचा आढावा मांडण्याची वेळ आली आहे,बारामतीत म्हणे विरोधक एकत्र असत पण निवडणूक लागली आणि एखादा उमेदवार उभा केला की शेवटच्या दिवशी अचानक चक्र फिरली जायची हे गौडबंगाल काय होतं हे सर्वन्यात आहे कारण तशी चर्चा ही अजूनही विषय निघाला तर होते,यातील उदाहरण द्यायचे झालं तर बारामती विधानसभा निवडणुकीत त्यावेळचे बारामती सहकारी बँकेचे चेअरमन पोपटराव तुपे यांना शिवसेनेने निवडणुकीत उभे राहण्याची गळ घातली याच विश्वासावर उभे राहिले प्रचार रंगात आला मात्र शेवटच्या दिवशी चक्र फिरली आणि त्यांच्या जवळ असणारे विरोधक अचानक फिरले आणि मताची घट झाली हे त्यावेळी तुपे यांनी बोलून दाखवली तर असाच प्रकार भारतीय जनता पार्टीने गोपीनाथ पडळकर यांना बारामती विधानसभा निवडणुकीत उभे केले यावेळी देखील प्रचार रंगात आला पण शेवटी होयचे तेच झाले शेवटच्या दिवशी पुन्हा चक्र फिरले आणि अखेर 40 टक्के मतदान असणारे डिपॉझिट जप्तीवर आले याला कोण व कुणी काय काय केलं हे सर्वांना माहीत असले तरी आजही त्याची चर्चा होतेय, पुन्हा लोकसभा लागली आणि सत्तेतील व सत्तेबाहेर असणारी एक झाली आणि शेवटी लोकसभा निवडणुकीत काय झालं हे पाहिलं यावेळी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगाफटका केला ते करणारे कोण हे दादा आपणाला माहीत आहे, कारण पूर्वी यांनाच आपण ऐनवेळी आपल्या जाळ्यात ओढले होते तेच आज आपल्या विधानसभा निवडणुकीत दगाफटका करतील याची श्वासती राहिली नसल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आत्ता तरी यांच्यापासून सावध राहावं अश्या प्रतिक्रिया उमटत आहे.
No comments:
Post a Comment