बारामतीत लॉजवर चालत होता बेकायदा वेश्या व्यवसाय; कारवाईत अनेकांना घेतले ताब्यात..
व्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा टाकत लॉज चालकासह कर्मचाऱ्यांना पोलिसांनी
ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली, बारामती व तालुक्यातील काही गावात राजरोसपणे सुरु
असलेल्या लॉजवर बेकायदा वेश्या व्यवसाय
करणारांवर पोलिसांनी छापा टाकायला हवा अशी मागणी होत असतानाच नुकताच या प्रकरणी लॉज चालकासह व्यवसाय चालविणाऱ्या कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामतीतील एका लॉजवर अवैध मानवी व्यापार चालू आहे, अशी गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली त्यानंतर गोपनीय बातमी मिळताच
पोलिसांनी सापळा रचून आणि बनावट
ग्राहक पाठवून बनावट ग्राहकाचा इशारा
होताच पोलिसांनी छापा टाकल्यावर
काही मुली आणि महिलांच्या माध्यमातून बेकायदा वेश्या व्यवसाय करीत असलेल्या लॉज चालक आणि कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.बारामती तालुक्यातील पारवडी पाटी
येथील एका लॉजवर पोलिसांनी छापा
टाकल्यानंतर बेकायदा देह व्यापार होत
असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास झाले
त्यानंतर पोलिसांनी लॉज मालक मॅनेजर
यांना ताब्यात घेतले. बारामती तालुका
पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार
प्रतिबंधक अधिनियमानुसार तालुका
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.अशीच कारवाई एमआयडीसी व आजूबाजूच्या परिसरातील व मोरगाव, मोरगाव रोड, भिगवण रोड व इतर ठिकाणी तसेच शहरातील काही लॉजवर व घरगुती प्लॅटवर रेड केल्यास नक्की काही काहींना कारवाई केल्यावर लक्षात येईल अशी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment