बारामतीत संविधान दिना निमित्त रॅली व उद्देशिकेचे वाचन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 27, 2024

बारामतीत संविधान दिना निमित्त रॅली व उद्देशिकेचे वाचन..

बारामतीत संविधान दिना निमित्त रॅली व उद्देशिकेचे वाचन..
बारामती :- २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात आली. बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथून इंदापूर चौक, सिनेमा रोड, भिगवन चौक या मार्गे
रॅली संपन्न झाली. बारामती नगर परिषदे
समोर संविधान सभेचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यक्रमात बारामतीचे
तहसीलदार गणेश शिंदे यांनी संविधान
उद्देशिकेचे वाचन केले. तसेच बारामती शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी तसेच
उपस्थित सचिन साबळे, अनिकेत मोहिते,
मंगलदास निकाळजे, फैयाज शेख, काळूराम
चौधरी, अँड. धीरज लालबिगे, सत्यव्रत
काळे, सुनील शिंदे, अँड करीम बागवान,
नवनाथ बल्लाळ यांनी आपले मनोगत व्यक्त
केले. सदर कार्यक्रमास बारामतीतील
प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय
विद्यार्थी बारामतील संविधान प्रेमी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे
आयोजन अनिकेत मोहिते, स्वप्निल
कांबळे, मन्सूर शेख तसेच बारामतीतील
संविधान प्रेमींनी केले होते तर सूत्रसंचालन
सलीम बागवान सर यांनी केले.

No comments:

Post a Comment